भुसावळ, जि.जळगाव : शहरात साकेगाव महामार्गावर ट्रॉमा सेंटर तथा उपजिल्हा रुग्णालय सुरू झाले आहे. ट्रॉमा सेंटर संपूर्ण सुसज्जतेने करण्यासाठी नियोजित डॉक्टर, स्टाफ व मशिनरी यांची उपलब्धता करून द्यावी, अशी मागणी जि.प.सदस्य रवींद्र पाटील यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली.टोपे हे शहराच्या पाहणीसाठी तसेच प्रशासनाशी चर्चा करण्यासंदर्भात आल्यानंतर त्यांच्याशी रवींद्र पाटील यांनी या मागण्यांबाबत चर्चा करून निवेदन दिले.कोणत्याही आजाराने किंवा अपघातात रुग्णाची स्थिती गंभीर झाल्यास जळगाव सिव्हिल रुग्णालयात हलवावे लागते. कोरोनाच्या संकटात सर्व मदार ही पालिकेच्या रुग्णालयावर आली आहे. कोरोना संशयित तपासणी, गरोदर स्त्रिया, इतर आजारांचे रुग्ण, अपघाती रुग्ण असा खूप मोठा भार पालिकेच्या रुग्णालयावर पडत आहे. त्यामुळे ट्रामा केअर सेंटरमध्ये सर्वतोपरी सुविधा मिळाल्यास इतर आजारांचे रुग्ण, अपघाती रुग्ण यांना जळगावला हलवण्याची गरज न पडता भुसावळ येथेच त्यांच्यावर तातडीने उपचार होतील.
भुसावळात ट्रामा केअर सेंटरमध्ये अत्याधुनिक सेवा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 3:27 PM
ट्रॉमा सेंटर संपूर्ण सुसज्जतेने करण्यासाठी नियोजित डॉक्टर, स्टाफ व मशिनरी यांची उपलब्धता करून द्यावी
ठळक मुद्देजि.प.सदस्य पाटील यांचे टोपे यांना निवेदन प्रत्येक वेळी रुग्णांना जळगावी लागते