जळगाव : डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील प्रवेशासाठी कंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या प्रथम व द्वितीय फेरीचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे. त्यानुसार सोमवार, ७ डिसेंबर रोजी तात्पुरती तर १२ डिसेंबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
डिप्लोमा प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया ही १० ऑगस्टपासून आणि थेट द्वितीय वर्ष पदविकासाठी अर्ज नोंदणीची प्रक्रिया ही १७ ऑगस्टपासून सुरू करण्यात आली होती. आता तंत्रशिक्षण संचालनालयाकडून डिप्लोमा प्रथम व थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेश प्रक्रियची प्रथम व द्वितीय फेरीचे वेळापत्रक प्रसिध्द केले आहे. प्रथम फेरीला ११ डिसेंबरपासून सुरूवात होईल. या दिवशी उपलब्ध असलेल्या प्रवर्गनिहाय जागा प्रदर्शित करण्यात येतील.१२ ते १४ डिसेंबर पर्यंत उमेदवारांना त्यांच्या लॉगिनमधून पाठ्यक्रम व संस्था यांचा पसंतीक्रम असणारा ऑनलाईन विकल्प नमुना भरावा लागेल व त्यास निश्चित करावा लागेल. १६ डिसेंबर रोजी तात्पुरते जागा वाटप प्रदर्शिंत करण्यात येईल. नंतर १७ व १८ या दोन दिवसात वाटप करण्यात आलेल्या जागेची विद्यार्थ्याला त्यांच्या लॉगिनद्वारे स्वीकृती करावी लागेल. अखेर १७ ते १९ डिसेंबरपर्यंत जागा वाटप झालेल्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना उपस्थित रहावयाचे आहे. आणि आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेशासाठी निश्चिती करावयाच आहे.
द्वितीय फेरी २० डिसेंबरपासून
प्रथम फेरी संपल्यानंतर २० डिसेंबरपासून द्वितीय फेरीला सुरूवात होणार आहे. या दिवशी पुन्हा उपलब्ध असलेल्या प्रवर्गनिहाय जागा प्रदर्शित करण्यात येणार आहे. शेवटी २५ ते २९ डिसेंबर या कालावधीत जागा वाटप झालेल्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना उपस्थित रहावयाचे आहे. आणि आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेशासाठी निश्चिती करावयाच आहे. दरम्यान, अधिक माहितीसाठी प्रा. पी.पी.गडे याच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आवाहन केले आहे.