ठळक मुद्देगो.से.हायस्कूलच्या शिक्षकांनी नोंदवला निषेधगो.से.हायस्कूलच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळी फीत लावून या शासन निर्णयाचा निषेध केला.
पाचोरा : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायकारक शासन निर्णयाविरोधात होणाऱ्या शाळा बंद आंदोलनास पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेने पाठिंबा दिला असून संस्थेच्या गो.से.हायस्कूलच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळी फीत लावून या शासन निर्णयाचा निषेध केला.यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सकाळी शाळेत एकत्र येऊन काळी फित लावून राज्य सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ११ डिसेंबर २०२० रोजी राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील चतुर्थश्रेणी कर्मचारी पद रद्द कारण्याबत काढलेला शासन निर्णय हा अतिशय अन्यायकारक असून या शासन निर्णयाला राज्यभरातून तीव्र विरोध होत असून प्रत्येक शाळेत शिपाई असणे गरजेचे आहे, असे मत यावेळी मुख्याध्यापक व शिक्षकांनी व्यक्त केले. संस्थाचालकांना शाळा बंद आंदोलनाला पाठिंबा देणारे निवेदन देण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर.एल. पाटील, एन.आर.पाटील, ए. बी. अहिरे, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, टेक्निकल विभागप्रमुख शरद पाटील यांचेसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.शाळा बंद आंदोलनास पी.टी.सी.चा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 1:59 PM