भडगाव, जि.जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून निवडणूक विभागातर्फे ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती भडगाव तालुक्यात प्रशासनाच्या व्हॅन व नेमलेल्या तीन पथकांमार्फत होत आहे. नुकतेच वाडेसह तालुक्यात एकूण १६ गावांना, तर २८ मतदान केंद्रांवर निवडणूक विभागामार्फत ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत नागरिकांना माहीती देण्यात आली.ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबतचा भ्रम दूर करण्यासाठी तालुक्यात निवडणूक प्रशासनामार्फत गावोगावी जनजागृतीसाठी एका व्हॅनची पथकासह सुविधा उपलब्ध केलेली आहे. नुकतीच या व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून तहसीलदार सी.एम.वाघ यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.तहसीलदारांनी जनजागृती व प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची यादी मान्यताप्राप्त राष्टÑीय व राज्यस्तरीय राजकीय पक्ष यांना दिली. शिवाय प्रशिक्षण व जनजागृती वेळापत्रकही दिले. तहसील कार्यालयात ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले होते.आता संपूर्ण तालुक्यात २८ पासून निवडणूक विभागामार्फत ईव्हीएम व व्हीव्हीपॅटसाठी जनजागृती व मतदारांसह नागरिकांना माहिती देण्याचे काम सुरू आहे. निवडणूक प्रशासनाने जनजागृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणीकामी एक व्हॅन व एकूण तीन पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. यात औद्योगिक प्रशिक्षण संस्था भडगाव येथील दोन तज्ज्ञ प्राध्यापक, दोन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, एक कोतवाल, एक पोलीस कॉन्सटेबल, स्थानिक तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांची नेमणूक केलेली आहे. यात तालुक्यातील वाडे, बांबरुड, प्रब, नावरे, भडगाव, बात्सर, घुसर्डी,गोंडगाव, शिंदी, पेंडगाव कोळगाव, बांबरुड प्रब, पिप्रीहाट यासह एकूण १६ गावांना ईव्हीएम व मशीन व्हीव्हीपॅटद्बारा प्रशिक्षण व लाभ देण्यात आला.तालुक्यात दररोज चार केंद्रांना हे प्रात्यक्षिक प्रशासनामार्फत दाखविले जात आहे, अशी माहिती निवडणूक नायब तहसीलदार अशोकराव कोल्हे यांनी दिली.वाडे येथेही ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत उपस्थित अधिकाºयांनी प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. नागरिकांना अधिकाºयांनी माहिती समजावून सांगितली. यावेळी निवडणूक विभागाचे नियुक्त अधिकारी मनोज टाचे, एस.व्ही. पाटील, नितीन निकम, गणेश पाटील, किरण पाटील, पोलीस कॉन्सटेबल समाधान पाटील, तलाठी बी.डी.मंडले, ग्रामसेवक राजेंद्र सोनवणे व माजी सरपंच आधार माळी, भीमराव पाटील, सुभाष पांडे, जगतसिंग परदेशी, लक्ष्मण पाटील, रवींद्र महाराज, आधार पाटील, आत्माराम पाटील, नारायण चौधरी, दुलीचंद परदेशी, शांताराम पाटील, अनिल मोरे, कोतवाल आबा मोरे, भास्कर नाईक, खंडू पाटील, मदन टेलर, रतन पाटील नीलेश परदेशी यांच्यासह ग्रामस्थ, तरुण मोठ्या संख्येने उपस्थि होते.
भडगाव तालुक्यातील वाडे येथे ईव्हीएम, व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 4:16 PM
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून निवडणूक विभागातर्फे ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती भडगाव तालुक्यात प्रशासनाच्या व्हॅन व नेमलेल्या तीन पथकांमार्फत होत आहे. नुकतेच वाडेसह तालुक्यात एकूण १६ गावांना, तर २८ मतदान केंद्रांवर निवडणूक विभागामार्फत ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत नागरिकांना माहीती देण्यात आली.
ठळक मुद्देनिवडणूक विभागाची स्वतंत्र व्हॅनभडगाव तालुक्यात १६ गावांना व २८ मतदान केंद्रावर जनजागृतीईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबतचा भ्रम दूर करण्यासाठी उपाययोजना