जळगाव : नेत्रदानाविषयी जनजागृती व्हावी यासाठी जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त जळगाव जिल्हा नेत्रतज्ज्ञ संघटना, आय.एम.ए. आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्तविद्यमाने शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली.अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्या मार्गदर्शनाने काढण्यात आलेल्या रॅलीला आय.एम.ए.चे सचिव डॉ.विलास भोळे यांनी हिरवा झेंडा दाखविला. या प्रसंगी प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, जळगाव जिल्हा नेत्रतज्ज्ञ संघटनेचे संस्थापक डॉ.धर्मेंद्र पाटील उपस्थित होते.रॅलीची सुरुवात आय.एम.ए.हॉलपासून होऊन शास्त्री टॉवर चौक, चित्रा चौक, पुष्पलता बेंडाळे चौक मार्गे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय परिसरात समारोप झाला. रॅलीमध्ये नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.योगेश टेनी, डॉ.पंकज शहा, डॉ.दर्शना शहा, डॉ. नैना पाटील, डॉ.रागिणी पाटील, डॉ.रंजना बोरसे, डॉ.नीलेश चौधरी, डॉ. अनुप येवले, डॉ.योगिता हिवरकर, मांगीलालजी बाफना नेत्रपेढीचे प्रकल्पप्रमुख चोरडिया, व्यवस्थापक भानुदास येवलेकर कर्मचारी, वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान नेत्रदान विषयी फलक सर्वांच्या हाती घेण्यात येऊन नेत्रदानाविषयी घोषणा देण्यात आल्या. यामुळे नागरिकांचे लक्ष रॅलीकडे वेधले. रॅलीच्या समारोप प्रसंगी डॉ.स्वप्नील कोठारी यांनी आभार मानलेयशस्वीतेसाठी डॉ.योगिता हिवरकर, डॉ. अनुप येवले तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कर्मचाºाांनी परिश्रम घेतले.
जळगावात रॅलीद्वारे नेत्रदानाविषयी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 1:05 PM
आय.एम.ए., नेत्रतज्ज्ञ संघटना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने आयोजन
ठळक मुद्देआरोग्यजागतिक दृष्टीदान दिनानिमित्त जळगाव जिल्हा नेत्रतज्ज्ञ संघटना, आय.एम.ए. आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्तविद्यमाने जनजागृती रॅली