जळगाव : जिल्हा पोलीस दलातर्फे आजपासून महामार्गावर हेल्मेट व सीटबेल्ट लावण्याची सक्ती केली जाणार होती. परंतू ग्रामीण भागात तसेच नागरिकांमध्ये अद्यापर्यंत हेल्मेट व सीटबेल्टबाबत पाहिजे त्या प्रमाणात माहिती पोहचलेली नाही़ त्यामुळे कर्मचाºयांनी महामार्ग तसेच राज्यमार्गावरील वाहनधारकांमध्ये जनजागृती करावी यानंतर किमान आठवडाभरानंतर कारवाई करावी, अशा सूचना पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी दिल्या असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे प्रदीप देशमुख यांनी दिली़महामार्गावर हेल्मेट, सीटबेल्टचा वापराबाबत सक्तीच्या अंमलबजावणीसाठी १० पासून कारवाईची मोहिम राबविण्याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सुपेकर यांनी दिले होते़ मात्र ग्रामीण भागातून शहरात येणाºया नागरिक अद्याप हेल्मेट व सीटबेल्टच्या निर्णयापासून अनभिज्ञ आहेत़ त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे़ त्यानंतरच कारवाईच्या सूचना दिल्या आहेत़ त्यानुसार जळगाव शहर वाहतूक शाखेतर्फे जनजागृतीवर भर दिला जात आहे़ शहर वाहतूक शाखेतर्फे गेंदालाल मिल येथील उर्दू शाळेत कार्यक्रम झाला़ यात शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रदीप देशमुख यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम, हेल्मेट, सीटबेल्ट, वाहतुकीचे नियम, झेब्रा क्रॉसिंग आदींची माहिती दिली़कारवाईच्या भितीने काही सुज्ञ नागरिक हेल्मेट घालूनच प्रवासाला निघाले़ शहरातील रस्त्यावर कारवाई होईल म्हणून अनेकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर केला़ शहरातील रस्त्यावरून वावरतांनाही काहींनी हेल्मेट घातल्याचे दिसून आले़
सक्ती ऐवजी पोलिसांकडून हेल्मेटबाबत जनजागृती
By admin | Published: February 11, 2017 1:02 AM