जिल्हा आरोग्य विभागातर्फे दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर जून महिना हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार, वाघळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गंत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.एस. जमादार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.अपर्णा पाटील व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे यांच्या सूचनेनुसार, हिवताप प्रतिरोग महिना साजरा करण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या हिंगोणा, मुदखेडा, हातले, वाघले या गावांमध्ये नागरिकांना डेंग्यू, चिकुनगुनिया, हत्तीरोग, चण्डिपुरा या साथीच्या आजारांविषयी खबरदारी घेण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम केदार, डॉ.श्रीमनी कोल्हे, पी.बी. गायकवाड, जे.आर. गायकवाड, विजय पगारे, आरोग्यसेवक विजय दाभाडे, व्ही.वाय. पाटील, एच.एस. कुलकर्णी डी.व्ही. पवार, प्रसाद वारुळे व इतर आशा कर्मचारी यांनी परिश्रम घेत आहेत.
वाघळी येथे हिवताप प्रतिरोगाच्या विरोधात जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 4:13 AM