शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

‘समतोल’च्या माध्यमातून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 11:54 AM

-सपना श्रीवास्तव

घरातून कुठल्याही कारणाने अथवा रागाने घर सोडलेल्या मुलांसाठी ‘समतोल प्रकल्प’ आधारवड ठरत आहे. तीन वर्षांपूर्वी ‘समतोल’ने जळगाव व भुसावळ स्टेशनवर कामाला सुरुवात केली असून, आजतागयत तब्बल १२३२ बालकांना सुखरुप त्यांच्या घरी सोपविले आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातीलच नव्हे तर विविध राज्यातील मुलांना, समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांच्यात परिवर्तन करुन घराकडे पाठविले आहे.समाजात दातृत्व निर्माण व्हावे, या भावनेतून केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यापैकी ‘आईसारखे समाजावर नि:स्वार्थ प्रेम करुया’ या मातृत्व भावनेतून केशवस्मृती प्रतिष्ठानने आॅक्टोबर २०१५ पासून ‘समतोल प्रकल्प’ राबविण्यास सुरु केली आहे. कुठल्यातरी कारणाने घरातून पळून गेलेल्या किंवा रागाच्या भरात घर सोडलेल्या बालकांचे बालपण गुन्हेगारीच्या मार्गावर जाऊ नये, या करिता अशा मुलांचे समतोलच्या माध्यमातुन समुपदेशन करुन त्यांना सुखरुप घरी पोहचविण्याचे काम या समतोल प्रकल्पाच्या माध्यमातुन केले जात आहेत. मुंबई येथील समतोल फाऊंडेशनतर्फे २००४ पासून रेल्वे स्टेशन मुंबई विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम सुुरु आहे. या उपक्रमाच्या कार्याबद्दल केशवस्मृती प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. अविनाश आचार्य यांच्या स्मृतीबद्दल देण्यात येणारा डॉ. अविनाशी सेवा पुरस्काराने २०१३ मध्ये या संस्थेचा सन्मान करण्यात आला होता. या संस्थेच्या कार्याची दखल घेत, केशवस्मृती प्रतिष्ठानने जळगाव व भुसावळ स्टेशनवर समतोल प्रकल्प सुरु करण्याचा निश्चय केला . याची जबाबदारी गेल्या अनेक वर्षांपासून शोषित आणि पीडितासांठी काम करणाऱ्या सपना श्रीवास्तव यांच्याकडे सोपविली आहे. श्रीवास्तव व त्यांच्या टीमने हा उपक्रम सुुरु करण्यासाठी जळगाव व भुसावळ स्टेशनवर सर्वेक्षण केले असता, चार दिवसांत त्यांना तब्बल २०० बालके आढळून आली. समतोलने तीन वर्षांपासून हा उपक्रम सुुरु केल्यापासून भंगार वेचणारे, नशा करणारे, चोरी करणारे अशा पद्धतीने गुन्हेगारी जगताकडे वळण घेणाऱ्या हजारो मुलांचे समुपदेशन करुन,त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे.-सपना श्रीवास्तवसमतोल प्रकल्प, जळगाव.