जळगाव : गफ्फार मलिक यांना ग्लोबल युनिव्हर्सिटी, चेन्नईने सामाजिक कार्याबद्दल पीएच.डी. प्रदान केली. त्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठचे कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा मणियार बिरादरी व अंजुमन तालीमुल मुस्लिमीन यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
कांताई सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला विशेष प्रमुख अतिथी म्हणून भारती सोनवणे, आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, इकरा सोसायटीचे अध्यक्ष करीम सालार, ॲड. अकिल इस्माईल, मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख व अँग्लो उर्दू ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ. बाबू देशमुख यांची उपस्थित होते. इम्रान खान यांनी कुराण पठण केले. मानपत्राचे वाचन फारुक शेख यांनी केले. प्रा.शगुफ्ता अकिल, सैयद चांद, आमीन बादलीवाला, शेख शफी, अजिज शेख, मोहिनुद्दीन उस्मानी, ताहेर शेख यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक डॉ. बाबू शेख यांनी केले. तर सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले. आभार प्रा. आसेफा खान यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्ह्यातील १०३ सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला.