शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जामनेर तालुकयात सार्वजनीक बांधकाम विभागाची कामे संथ गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 3:21 PM

जि.प.च्या कामांना निधीचा ब्रेक

जामनेर : जिल्हा परिषद बांधकाम विभागाकाडून ग्रामीण भागात रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे केली जातात. अशी सध्या आठ ठिकाणाची कामे मंजूर आहे, मात्र निधी नसल्याने कामे सुरु होऊ शकली नाही. पावसाळ्यात कामे बंद असल्याचे सांगण्यात आले. तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन राज्य मार्ग व जिल्हा मार्गांची कामे केली जात असून त्यापैकी सध्या तालुक्यात मुक्ताईनगर ते पहूर रस्त्याचे काम सुरु आहे. हे काम अत्यंत संथ गतीने तब्बल तीन वर्षांपासून सुरु आहे.जळगाव औरंगाबाद रस्त्याचे तालुक्यातील वाकोद पर्यंतचे काम हनुमानाच्या शेपटी प्रमाणे लांबतंच आहे. खोदलेल्या रस्त्यामुळे गेली दोन पावसाळे वाहन धारकांना मोठा त्रास सहन करावा लागला. ठेकेदाराची मनमानी व अधिकाऱ्यांचे मौन यामुळे कुणाचेही याकडे लक्ष नाही.जामनेर -फत्तेपूर -धामणगाव या जळगाव व बुलढाणा अशा दोन जिल्ह्याना जोडणाºया प्रमुख रस्त्याचे काम सुरु आहे. या कामाबाबत काही गावातील नागरिकांनी तक्रारी करून देखील त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.विधान सभा निवडणुकीपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी भूमिपूजन केलेल्या कामांपैकी सुमारे ८० टक्के रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहे. जि.प.बांधकाम विभागाकडून होत असलेल्या डांबरीकरणावर मोठा खर्च होत असला तरी काही दिवसातच रस्त्याची दुर्दशा होते, असे का ? असाही प्रश्न उपस्थित होते.