जळगाव : कोरोनाग्रस्त रुग्णांचा वाढत जाणरा आलेख आणि वाढती गर्दी यामुळे प्रशासनासमोर कोरोना रोखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. कोरोना वेगात फैलावत असताना कोणतेही नियम पाळण्यात अनेक नागरिकांना आता स्वारस्यच राहिले नसल्याचे कन्टेनमेंट झोनच्या ठिकाणी केलेल्या स्टींग आपरेशनमध्ये आढळून आले. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे काही नागरिक मात्र प्रशासनाच्या अटी आणि शर्थीचे पालन करत असल्याचेही दिसून येत होते.प्रशासनही आता कन्टेनमेंट झोनबाबत म्हणावी तशी काळजी घेत नसल्याचे चित्र दिसून आले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग हा साऱ्यांच्याच चिंतेचा विषय ठरला आहे. यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. वाढती गर्दी हे त्यामागचे एक मुख्य कारण सांगितले जात आहे. मात्र एकीकडे असे असताना दुसरीकडे कन्टेनमेंट झोनसाठी प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळण्याच्या मन:स्थितीतही नागरिक नसल्याचे दिसून येत आहे. काही नागरिक मात्र प्रामाणिकपणे प्रशासनाच्या नियमांचे पालन करत असल्याचे दिसून आले.कन्टेनमेंट झोनमधील स्थिती सध्या कशी आहे? याबाबतचा आढावा घेण्यासाठी ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी काही ‘कन्टेनमेंट झोन’चा दौरा केला तर अनेक ठिकाणी कन्टेनमेंट झोनसाठीचे नियम पाळले जात असल्याचे दिसून आले. मात्र काही ठिकाणी नियम बिनधास्तपणे पायदळी तुडवले जात असल्याचे चित्र दिसून आले.-एलआयसी कॉलनीतील केवळ एकाच घराला कन्टेनमेंट झोन करण्यात आले आहे. या घराच्या प्रवेशव्दाराला कुलूप लावण्यात आले होते आणि त्याठिकाणी कन्टेनमेंट झोन असल्याचा फलकही लावण्यात आला होता. सकाळी या ठिकाणी तीन पोलीस तैनात होते दुपारी मात्र पोलीस नव्हते.-दंगलग्रस्त भागातील कन्टेनमेंट झोनला लागूनच चिकनसह अन्य दुकाने सुरु ठेवण्यात आली होती आणि याठिकाणी ग्राहकांची गर्दीही होती. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी फलक लावण्यात आला होता. त्या फलकासमोर रिक्षा लावण्यात आली होती. म्हणजे हा फलक कुणालाही दिसणार नाही. त्या शेजारीच मटनाची दुकाने मात्र सुरु होती. ग्राहकही येत होते. शिवाय इथे उभे राहणारे येणाºया - जाणाऱ्यांकडे संशयाने पाहत होते.-शनिपेठ याठिकाणी असलेल्या कन्टेनमेंट झोनमध्ये एकच घर सामील आहे. सध्या त्या घराच्या प्रवेशव्दाराला कुलुप लावण्यात आले अन् त्या घरात कुणीच राहत नव्हते.-शहरातील काही भागात कन्टेनमेंट झोन हा नावालाच असल्याचेही दिसून आले. कारण काही ठिकाणी फूटभर उंचीचे पत्रे लावून कन्टेनमेेंट झोन करण्यात आले होते. तांबापुरा परिसरातील एका ठिकाणी फूटभर उंचीचा पत्राही एका बाजूला वाकवण्यात आला होता आणि त्याठिकाणी छोटी मुलंही कन्टेनमेंट झोनमधून आत-बाहेर करत होती. याठिकाणी अधूनमधून पोलिस बंदोबस्त असतो. अशी माहिती नागरिकांनी दिली. तांबापुरातीलच एका ठिकाणी दोन घरापुरता कन्टेनमेंट झोन होता. ‘लोकमत’ची टीम याठिकाणी पोहोचली त्यावेळी त्याठिकाणी कुणाची ये-जा सुरु नव्हती.अनेक ठिकाणी फलकही नाहीतआश्चर्याची बाब म्हणजे अनेक कन्टेनमेंट झोनच्याठिकाणी साधा फलकही लावण्यात आलेला नाही. त्या परिसरातील काही लोकांनाच याठिकाणी कन्टेनमेंट झोन असल्याची माहिती होती. अन्य नागरिकांच्या गावीही हे कन्टेनमेंट झोन नसल्याचे दिसून आले. काही ठिकाणी पत्रे तर काही ठिकाणी बांबूनी अर्धवट रोखलेली वाट, हीच काय ती कन्टेनमेंट झोनची ओळख!दांडेकर नगरपिंप्राळा दांडेकर नगरात एक घर सील करण्यात आले आहे. त्यासमोरुन सर्रास वाहतूक सुरु असते. या घराला सील करण्यात आले आल्याचा फलकही लावण्यात आला आहे. मात्र तो सहजपपणे द्दष्टीस पडत नाही.