जळगाव : राष्ट्रीय शिक्षण दिनाचे औचित्त्य साधून डिजिटल शिक्षण या विषयावर आधारीत पुस्तकाचे प्रकाशन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्रा.डॉ.पी.पी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात डिजिटल क्रांती झाल्याचे दिसून आले. याच बदलाचा अभ्यास करून डिजिटल शिक्षण, संसाधने, तंत्रे आणि पद्धती अशा विविध महत्वपूर्ण पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकाचे संपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. संतोष खिराडे आणि विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत के.ए.के.पी संस्थेचे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथील ग्रंथपाल हितेश ब्रिजवासी यांनी केले आहे. या पुस्तकाचे नुकतेच कुलगुरूंच्याहस्ते प्रकाशन झाले असून त्यावेळी प्रकाशक प्रदीप पाटील, डॉ. विवेक काटदरे आदींची उपस्थिती होती.
डिजिटल शिक्षणावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 7:24 PM