चाळीसगाव, जि.जळगाव : य.ना. चव्हाण कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व राष्ट्रीय ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत निकिता पाटील (पुणे), महेश गणेश अहिरे (मालेगाव) यांना प्रथम क्रमांकावर मोहोर कोरली. ही स्पर्धा सोमवारी पार पडली. प्रथम बक्षिस विभागून देण्यात आले. रोख ११ हजार रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप होते.द्वितीय बक्षिस रू. ७५००, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र धोंडीराम टकले या विद्यार्थ्याने मिळविले तर तृतीय बक्षिस तेजस्विनी नारायण केंद्रे (औरंगाबाद) हिला गेले. बक्षिसाचे स्वरूप रू. पाचहजार रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे होते. उत्तेजनार्थ बक्षीस सोनल भगवान जाधव (अहमदनगर) व इरफान इक्बाल शेख यांनी मिळविले. त्याचे स्वरूप रू. एकहजार रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे होते.या स्पर्धेचे प्रायोजकत्व संस्थेचे संचालक व वास्तूरचनाकार धनंजय चव्हाण, प्रतापसिंंग महाले, पंढरीनाथ निकम, रवींद्र पाटील, शरद जुलाल पाटील, दिलीपराव गोविंदराव देशमुख यांनी घेतले होते. या स्पर्धेसाठी राज्यभरातून एकूण ५८ संघ सहभागी झाले होते.स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार राहुल रनाळकर यांच्या हस्ते, तर ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी निवृत्त मुख्याध्यापक एस.डी. पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी विचारमंचावर अरूण निकम, संजय रतन पाटील, बी.व्ही.चव्हाण, धनंजय चव्हाण, सुधीर पाटील, आनंदा पाटील, अविनाश देशमुख, शेषराव पाटील, विश्वास चव्हाण, प्राचार्य डॉ.एस.आर.जाधव, लक्ष्मण चव्हाण, प्रकाश देशमुख, प्राचार्या साधना बारवकर, प्राचार्य व्ही.जे.चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य तानसेन जगताप होते. यावेळी डॉ.विनोद कोतकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.प्रा.योगिता पाटील, समृध्दी सोलंकी व प्रा.गणेश पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रा.टी.एस.चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.मनोज शितोळे यांनी आभार व्यक्त केले. मुकेश पवार यांचे सहकार्य लाभले.
चाळीसगावच्या वक्तृत्व स्पर्धेत पुणे-मालेगाव प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 12:12 AM
य.ना. चव्हाण कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व राष्ट्रीय ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत निकिता पाटील (पुणे), महेश गणेश अहिरे (मालेगाव) यांना प्रथम क्रमांकावर मोहोर कोरली.
ठळक मुद्देनिकिता पाटील व महेश अहिरे संयुक्तपणे ठरले प्रथम क्रमांकाचे विजेतेप्रथत विजेत्यांना रोख ११ हजारांचे बक्षीस मिळाले विभागूनराज्यभरातून ५८ संघ सहभागी