ब्रेक दी चेनअंतर्गत पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी विनाकारण फिरणारे, नियमभंग करणारे यांच्यावर वचक बसवण्यासाठी चोपडा व पारोळा रस्त्याच्या संगमावर पैलाड चौक, धुळे रस्त्यावर कलागुरू मंगल कार्यालयाजवळ तसेच गलवाडे रस्त्यावर नाकाबंदी करून मोटारवाहन कायद्याप्रमाणे ३४ लोकांवर १४ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. विनाहेल्मेट मोटारसायकल चालवणाऱ्या १० जणांवर कारवाई करून त्यांना ऑनलाईन दंड करण्यात आला आहे, तर ९८ जणांकडून ३६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कारवाईत एपीआय राकेशसिंग परदेशी, पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ, पोलीस उपनिरीक्षक राहुल लबडे या अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांचा समावेश होता. दरम्यान, कारवाई होत असताना बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे. सकाळी ११ ऐवजी दुपारी १-२ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहतात. पालिकेच्या पथकाने कारवाई थांबवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
===Photopath===
290521\29jal_15_29052021_12.jpg
===Caption===
रस्त्यांवर नाकाबंदी करून कारवाई करताना पोलीस अधिकारी व कर्मचारी. (छाया : अंबिका फोटो)