एकीकडे पोलीस, पालिका, आरोग्य विभाग डोळ्यांत तेल ओतून २४ तास काम करीत आहे. असे असताना कोरोना साखळी तुटावी, याकरिता परिश्रम घेत आहे. शहरातील चौकाचौकांमध्ये प्रत्येकाच्या कसून चौकशीसह अँटिजन तपासणी करण्यात येत आहे. एवढ्यावरही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली. अशांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.
दिनांक वाहनांची संख्या रक्कम
१५ १२६ ४२,३००
१६ १२४ ४२,२००
१७ २२४ ६७,४००
१८ २६० ७७,२००
१९ २०६ ५४,१००
२० २१४ ५५,०००
२१ १३३ ३६,४००
२२ १८३ ४,७७,१००
२३ १५२ ४१,१००
२४ १४१ ३३,९००
२५ १८३ ४६,६००
२६ १३९ ३१,६००
२७ १४८ ३७,४००
२८ १५७ ३९,९००
--------- --------------
२,३९० १०,८२,२००
या ठिकाणी झाली कारवाई
या ठिकाणी झाली वाहनांवर कारवाई
अष्टपूजा मंदिर चौक, बाजारपेठ पोलीस ठाणेसमोर, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, बसस्टँड परिसर, नहाटा चौफुली, आनंदनगर स्टेट बँकेसमोर, रजा टाॅवर चौक, जळगावनाका.
ही कारवाई डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्यासह वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.
शासनाने दिलेल्या गाइडलाइन प्रत्येकाने तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये. विशेषत: युवकांनी याचे भान ठेवावे. विनाकारण फिरणाऱ्यांवर सातत्याने कारवाई करण्यात येईल. वेळप्रसंगी गुन्हे दाखल करण्यात येईल.
-सोमनाथ वाघचौरे, डीवायएसपी, भुसावळ