ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 21 - अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी पोलीस बंदोबस्त मिळू न शकल्याने सुरू होणारी अतिक्रमण निमरूलन मोहीम पुन्हा एक दिवस पुढे ढकलण्यात आली. या कारवाईसाठी महापालिकेतील तब्बल 150 कर्मचारी, स्वच्छता मोहीमेवरील एक जेसीबी, दोन ट्रॅक्टर व एक ट्रक असा सकाळी 8 ते दुपारी 12.30 असा तब्बल साडेचार तार बसून होता. दरम्यान, ही मोहीम आता मंगळवारपासून सुरू करण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. शहरातील अतिक्रमणांबाबत स्थायी समिती सभेत सदस्यांनी वाढत्या अतिक्रमणांबाबत तक्रार केली असता प्रभारी आयुक्तांनी शहरात धडक मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. अतिक्रमणांवर आता जप्तीची कारवाई न करता ते जागीच जेसीबीने नष्ट करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानुसार गेल्या आठवडय़ात ही मोहीम राबविण्यात येणार होती. मात्र शहरात साथ रोगांची स्थिती लक्षात घेऊन या मोहीमेकडे कर्मचारी वर्ग केल्याने अतिक्रमण मोहीम लांबली. आता सोमवारपासून ही मोहीम राबविण्याचा निर्णय झाला होता. पोलीस आलेच नाहीतकारवाईचे सर्व नियोजन होऊनही सकाळी 9 ते 11 र्पयत शहर व शनिपेठ पोलीस स्टेशनचा ताफा कारवाई मोहीमेत सहभागी झाला नाही. अखेर जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांच्या आदेशावरून अपर आयुक्त राजेश कानडे, उपायुक्त चंद्रकांत खोसे, अतिक्रमण निमरूलन विभागाचे अधीक्षक एच.एम. खान हे पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचले. पुन्हा बैठकदाणा बाजारातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक व व्यापा:यांशी दोन दिवसात बैठक व चर्चा करून मोहीम राबविण्यापूर्वी व्यावसायिकांनी अतिक्रमणे काढावीत असे ठरले. पुन्हा बैठकीचे सत्र पोलीस अधीक्षक कार्यालयात उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या दालनात बैठक झाली. मनपाचे अधिकारी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास सोनवणे हेदेखील उपस्थित होते. दुपारी 11 ते 12.30 या वेळात डीवाय.एस.पी. सांगळे यांच्या दालनात बैठक झाली. मनपाने पोलिसांविना कारवाईचा निर्णय घेतला होता तो सांगळे यांनी मध्यस्थीकरून मागे घेण्याची विनंती केली. सांगळे यांच्या आवाहनानंतर आजची मोहीम रद्द करण्यात येऊन मंगळवारी सकाळी 9 वाजेपासून कारवाई सत्र हाती घेण्याचा निर्णय झाला. कारवाईसाठी अतिरिक्त बंदोबस्त देण्याची तयारीही सांगळे यांनी दर्शविली. दाणा बाजारात दिवसा ‘नो एन्ट्री’ पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे याच्या उपस्थितीत दाणा बाजार असोसिएशनचे पदाधिकारी व मनपा अधिका:यांची बैठक झाली. बैठकीत दाणा बाजारातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी या परिसरात सकाळी 7 ते दुपारी 2 व दुपारी 4 ते रात्री 9 या वेळात चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी लागू करण्याचा निर्णय झाला. अन् कर्मचारी परतलेसोमवारी दुपारी 12.30 वाजता आजची मोहीम रद्द झाल्याचा निरोप महापालिकेत पोहोचल्यावर मोहीमेसाठी बोलविलेल्या कर्मचा:यांना त्यांच्या विभागात जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. मंगळवारी त्यांना सकाळी 8 वाजता हजर रहाण्याचे आदेशही देण्यात आले. दाणा बाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया, मुकेश लोटवाला, सतीश जगवाणी, लक्ष्मीकांत वाणी, संजय रेदासनी, अशोक धुत, अश्विन सुरवाला आदींनी या बैठकीत सहभाग घेऊन सहकार्याची तयारी दर्शविली.