शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

पर्स हरवली अन्...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 1:19 PM

पर्स डोक्याशी आणि सुटकेस पायाशी ठेवून झोपायचा निष्फळ प्रयत्न केला

गेल्या महिन्यात रोटरी कॉन्फरन्सच्या निमित्ताने नागपूर येथे जाणे झाले. तशी मला पर्स वापरायची सवय नाही; पण बाहेरगावी जायचं म्हटल्यावर पर्स ही आलीच. नागपूरला जाताना सर्व मेंबर्स बरोबर होते आणि कॉन्फरन्सच्या ठिकाणीही सर्व मेंबर्स असल्यामुळे पर्स सांभाळणे सहज शक्य झाले. कारण कुणीतरी पटकन म्हणायचे, ‘मॅडम, पर्स राहिली ना! त्यामुळे दोन दिवस व्यवस्थित पार पडले. पण, येताना मात्र माझ्या रेल्वेच्या डब्यात मी एकटीच होते.बाकी सर्व सभासद दुसऱ्या दिवशी येणार होते आणि दुस-या रोटरी क्लबचे सभासद वेगवेगळ्या डब्यात होते. त्यामुळे एकटी असल्याचे टेन्शन होते. झोप लागत नव्हती. पर्स डोक्याशी आणि सुटकेस पायाशी ठेवून झोपायचा निष्फळ प्रयत्न केला. त्यातच थोडासा डोळा लागला आणि टी.सी.ने जळगाव आलं म्हणून उठवलं. सुटकेस घेतली आणि दार कसं उघडावं, अजून कोणी असेल का? म्हणून दाराकडे निघाले. तेवढ्यात पुढच्या डब्यातून मेंबर्सनी हात दिला इकडे या म्हणून आणि हायसं वाटून मी चालायला लागले. ‘या गडबडीत पर्स सिटवरच राहिली; पण उतरण्याच्या धांदलीत लक्षात आलेच नाही. खाली उतरलो. सर्व जण जिन्याकडे चालू लागलो आणि गाडी पुढच्या स्टेशनकडे निघाली. लक्षात आले की पर्स नाही. स्टेशनवर सर्वत्र नजर फिरवली. गर्दी नव्हतीच. त्यामुळे कुठे पर्स दिसलीच नाही आणि लक्षात आले आपण डब्यातच पर्स विसरलो. लगेचच सगळ्यांनी आपापल्या रोटरी मित्रांना फोन सुरू केले. तेव्हा लक्षात आले डब्यात चाळीसगावचे रोटरी सभासद होतेच. लगेच त्यांना फोन लावला. सीट नंबर व पर्सचे वर्णन दिले आणि ताब्यात घेण्याची विनंती केली. त्याचवेळी माझ्या डब्यात माझे लांबचे नातेवाईक होते. त्यांनी मला ओळखले होतेच. त्यांनी ती पर्स आधीच ताब्यात घेतली होती. मला फोन केला. मी त्यांना सांगितले, चाळीसगावचे रोटरी सभासद येतील, त्यांना पर्स द्या. म्हणजे सकाळी कुणाही अप-डाऊन करणाºयाबरोबर ती जळगावला परत येईल. खरोखरच ८.३० वाजता पर्स माझ्या हातात होती आणि जीव भांड्यात पडला. पर्स मिळाल्यावर शांतपणे विचार मनात आला की हे सर्व घडले ते रोटरीच्या सभासदांमुळे तसेच मोबाइल असल्यामुळे. दरम्यान, पर्स मिळाली नाही तर विचार मनात आला आपले सर्व कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, आधारकार्ड, एमएमसी सर्वच पर्समध्ये आहेत. हे सर्व परत मिळविणे महाकर्मकठीण आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे बेडरूमची किल्ली. कुणाला बोलवावं लागेल आणि केव्हा कुलूप उघडेल तो एक ‘राम जाने या खुदा जाने’. मै तो बस पर्स हाथ में लेकर सोचती ही रही की सच उपरवाला कितना अच्छा और कृपालू है। ४.३० बजे पर्स गुम है और ८.३० बजे वापर मेरे पास है....- डॉ.सुमन लोढा

टॅग्स :Jalgaonजळगाव