शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेला जळगावात थाटात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 12:48 PM

15 सघांचा सहभाग : पहिल्याच दिवशी सादर चार एकांकिकांनी जिंकले मन

ठळक मुद्देकेसीईचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण‘मानस’, ‘स्टॅच्यु’, ‘च्या बही‘, ने जिंकली मने पुढील वर्षी स्पर्धेसाठी बंदीस्त नाटय़ उपलब्ध व्हावे

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 17  -  महाराष्ट्र कलोपासक (पुणे) आणि केसीई सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त मूळजी जेठा महाविद्यालयाच्या नाटय़शास्त्र विभागातर्फे आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेला शनिवारी घंटानादाने थाटात सुरुवात झाली. भैयासाहेब गंधे सभागृहात आयोजित या स्पर्धेमध्ये पहिल्याच सादर करण्यात आलेल्या चार एकांकिकांनी उपस्थितांची दाद मिळवित मने जिंकली. या उद्घाटन सोहळ्य़ाच्या अध्यक्षस्थानी केसीई संस्थेचे सहसचिव किरण बेंडाळे होते तर उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर उपस्थित होते.  प्रमुख पाहुणे म्हणून ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, कलोपासक पुणेचे राजेंद्र नागरे, परीक्षक श्रीपाद देशपांडे, अजय धवने, गिरीष केमकर, संस्थेचे सभासद शशिकांत वडोदकर, चारूदत्त गोखले उपस्थित होते. या वेळी दीपप्रज्‍जवालन, नटराज पूजन करण्यात येऊन जिल्हाधिकारी व उपस्थित मान्यवरांच्याहस्ते घंटानाद करून स्पर्धेचे उद्घाटन झाले. प्रस्ताविक प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांनी केले. यामध्ये त्यांनी स्पर्धेच्या आयोजनाची महाराष्ट्र कलोपासकने संधी दिली म्हणून त्यांचे आभार मानले. तसेच विद्याथ्र्यानी शिस्तबध्दपणे कला सादर करावी, असे आवाहन केले.

पुरुषोत्तम करंडक स्पर्धा कलावंतासाठी व्यासपीठजिल्हाधिकारी निंबाळकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, विद्याथ्र्यामधील कलावंताला साद घालण्याचे काम पुरूषोत्तम करंडक स्पर्धा करते. या स्पर्धेने नवोदीत कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम केले असून यातून घडलेले अनेक कलावंत आज चित्रपटसृष्टीत असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. महाविद्यालयीन जीवनात नाटय़ स्पर्धांमध्ये भाग व प्रोत्साहन देण्याचे काम करण्यासह यातील एकही स्पर्धा सोडली नाही, अशी आठवण त्यांनी सांगितली. ही स्पर्धा प्रतिष्ठेची असून यात युवकांनी सहभागी व्हावे, असेही त्यांनी आवाहन केले.

 पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची सर्वांना उत्सुकतामिलिंद कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात सुरुवातीलाच सांगितले की, पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची सर्वच महाविद्यालयांना उत्सुकता असते, इतके वलय या स्पर्धेने निर्माण केले आहे. महाविद्यालयांमधील प्रत्येक विद्यार्थी किरण बेंडाळे यांचा सारखा रंगकर्मी नसला तरी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्यासारखा रसिक असून त्याला या स्पर्धेची उत्सुकता असते, असाही उल्लेख त्यांनी केला. मी मू.जे. महाविद्यालयाचाच विद्यार्थी असून 1985मध्ये मू.जे. महाविद्यालयाची ‘बाळू जोशीला काय वाटते ?’ ही एकांकिका विजेती ठरली त्यामुळे आम्हाला प्रचंड आनंद झाला व दुस:या दिवसाचा जल्लोष आजही लक्षात असल्याचा उल्लेख करून या स्पर्धेचे वलय किती असते, हे स्पष्ट केले. जळगावात स्पर्धेचे केंद्र बंद पडते की काय अशी भीती असताना पुरुषोत्तक करंडक स्पर्धेची परंपरा खंडित न होऊ देता मू.जे. महाविद्यालयाने त्याची घौडदौड कायम ठेवली, याबद्दल आनंद व्यक्त केला. मुंबई, पुण्यात  न जाता आता येथेच केसीई संस्था सर्व शिक्षण उपलब्ध करून देत असून येथून तयार झालेले विद्यार्थी मुंबई-पुण्यात पोहचले असल्याचेही गौरोद्गार त्यांनी काढले. याच महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या प्रतिभाताई पाटील राष्ट्रपतीपदार्पयत पोहचल्याचेही त्यांनी आवजरून सांगितले. 

पुढील वर्षी स्पर्धेसाठी बंदीस्त नाटय़ उपलब्ध व्हावेयंदा या ठिकाणी ही स्पर्धा होत असली तरी शहरात प्रगतीपथावर  असलेल्या अद्यायावत बंदीस्त नाटय़गृहात ही स्पर्धा व्हावी व त्यासाठी ते पुढील वर्षार्पयत खुले व्हावे, अशी विनंती मिलिंद कुलकर्णी यांनी जिल्हाधिका:यांनी केली. 

शिक्षणासोबत व्यक्तीमत्त्वाच्या विकासाकरीता विविध उपक्रमकिरण बेंडाळे म्हणाले की, मूळजी जेठा महाविद्यालय हे विदयाथ्र्यांना केवळ शैक्षणिक सुविधा देत नाही तर त्यासोबत त्यांच्या व्यक्तीमत्त्वाच्या विकासाकरीता विविध उपक्रम राबवित आहे. जलश्री, विविधता संशोधन केंद्र, एकलव्य क्रीडा संकूल या विभागाद्वारे राबविण्यात येणा:या उल्लेखनीय उपक्रमाचीदेखील त्यांनी माहिती दिली. राजेंद्र नांगरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आयोजकांमध्ये केवळ केसीई संस्थेनेच स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य केल्याचे नमूद करीत कलोपासकच्या  हाकेला केसीईने मान दिल्याबद्दल आभार मानले.सूत्रसंचालन प्रा.योगेश महाले यांनी करून आभार मानले. स्पर्धा आयोजनासाठी शशिकांत वडोदकर, नाटय़शास्त्र विभागाचे प्रमुख हेमंत पाटील,  प्रा.जुगलकिशोर दुबे, प्रा.विश्वजित चौधरी, प्रा.कपील शिंगाणे, प्रा.प्रसाद देसाई, प्रा.स्वप्ना लिंबेकर, प्रा.योगेश महाले, डी.डी.झोपे, प्रा.विजय लोहार, प्रा.अविनाश काटे, राकेश वाणी यांच्या अध्यक्षतेखाली समित्या परिश्रम घेत आहे. केसीईचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पणखान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीने 16 सप्टेंबर रोजी 75व्या वर्षात पदार्पण केले.  याचे औचित्य साधत या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

जळगावच्या नाटयगृहाचे 1 जानेवारीला लोकार्पणपुढील वर्षीर्ही स्पर्धा अद्ययावत बंदीस्त नाटय़गृहात  व्हावी अशी विनंती मिलिंद कुलकर्णी यांनी केल्यानंतर किरण बेंडाळे यांनीदेखील आपल्या भाषणात याचा धागा पकडत तसा उल्लेख केला. त्यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी 1 जानेवारी 2018 रोजी त्याचे लोकार्पण होईल, अशी घोषणा  केली. 

‘मानस’, ‘स्टॅच्यु’, ‘च्या बही‘, ने जिंकली मने पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एंकाकिका स्पर्धेत पहिल्या  दिवशी सादर झालेल्या ‘मानस’ , ‘स्टॅच्यु’, ‘च्या बही’ या एंकाकिकांनी रसिकांची मने जिंकली.  

‘मानस’मधून मानसिक आजारी तरुणाच्या व्यथेचे दर्शन गोदावरी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च तर्फे सादर मानस या रहस्यमय एकांकिकेत मानसिक आजारी असलेल्या  तरुणाची व्यथा मांडण्यात आली असून मानस (आकाश शर्मा) त्याची प}ी स्वप्नाली हिला (अेषा गायकवाड) काहीतरी भास होतात, अशा समजातून मानसोपचार तज्ज्ञाकडे  उपचारासाठी नेतो. पूर्ण एकांकिका मानस, स्वप्नाली, डॉक्टर या तिघांभोवती फिरते.  ऋषिकेश तुरई लिखित ‘मानस’ या एकांकि केचे आकाश शर्मा यांनी  दिग्दर्शन केले आहे.

‘स्टॅच्यु’द्वारे मानवतेचा शोधआयएमआर महाविद्यालयाच्या स्टॅच्यु  या एकांकिकेत समाजातील स्त्री अत्याचार, पुतळयांच्या कोनशिलेची चोरी,  पुतळयांची दुरूस्ती तसेच विविध घडामोडीवर भाष्य करण्यात आले आहे. अंधारात भरकटलेल्या जगात मानवतेचा शोध घेणारी माई (शिवानी भावसार)ची भूमिका रसिकांना आवडली. एकांकिकेत पांढरा (गौरव पटेल), स्टोनी वेलकम (सचिन महाजन), सिल्व्हर (केतन देशमुख), आकाश सोनवणे, विवेक रूळे, चेतन पाटील, पारस सोनवणे यांच्या भूमिका आहेत. दिग्दर्शन केतन देशमुख यांनी केले असून लेखन समीर तडवी यांचे आहे.

‘च्या बही’ने पटविले मातृभाषेचे महत्त्व डॉ. अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयातर्फे सादर ‘च्या बही’ एकांकिकेत मातृभाषेचे महत्त्व विशद करण्यात आले असून यात 10 विनोदी कलावंतांनी (जोकर) इंग्रजी भाषेचा उदो-उदो कसा चालतो हे दाखविले आहे. देशातील भाषांना कशा पध्दतीने दुय्यम दर्जा आपणच देतो याचे चित्र कलावंत विद्यार्थिनींनी उभे केले आहे. सपना बाविस्कर, आरती गोळीवाले, प्रियंका वाणी,  हर्षदा पाटील, प्रणाली माळी, चंद्रकला शिंदे, विशाखा चव्हाण, जयश्री पाटील, राजश्री खडके, अंकिता सोनार यांच्या भूमिका आहेत. लेखिका प्रणाली माळी असून दिग्दर्शिका आरती गोळीवाले आहेत. 

आज  सादर होणा:याएकांकिका17 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 1 वाजेदरम्यान कोटेचा महिला महाविद्यालय, भुसावळची ‘पुरुष’, समाजकार्य विभाग, उमविची ‘कॅफे शुभमंगल’, एम.डी. पालेशा कॉमर्स कॉलेज, धुळेची ‘ब्रेकअप के बाद’ या एकांकिका सादर होणार आहे. दुपारच्या व संध्याकाळच्या सत्रात 2 ते 7 या वेळेत देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयाची ‘कबूल है’, नाहटा महाविद्यालय, भुसावळची ‘एक्स’, प्रताप महाविद्यालय, अमळनेरची ‘रावीपार’, नॉलेज सिटी अभियांत्रिकी महाविद्यालय, बांभोरीची ‘उंच माझा झोका गं..’,  शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालय, धुळेची ‘पंचावन्न आणि साठीतले प्यादे’ या एकांकिकांची मेजवानी रसिकांना पाहायला मिळणार आहे.  रसिक, विद्यार्थी, शिक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन स्पर्धेच्या स्वागत समितीने केले आहे.