जळगाव : यवतमाळ येथील अखिल भारतीय साहित्य संमलेनात ज्येष्ठ इंग्रजी साहित्यिक यांना उद्घाटनासाठी निमंत्रण देवून नंतर ते रद्द करणे म्हणजे साहित्यिकाचा अपमान करण्याचाच प्रकार आहे. संमलेनात कोणास बोलवावे, येणाऱ्याने काय बोलावे यासाठी दबावातून हे प्रकार घडणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा घाला आहे, असे स्पष्ट मत साहित्यिक अशोक कोतवाल यांनी व्यक्त केले. या एकूण प्रकाराबाबत त्यांची विशेष मुलाखत त्यांच्या शब्दात...प्रश्न - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उद्भवलेल्या वादाबद्दल आपणास काय वाटते?नयनतारा सहगल यांना संमेलनाचे निमंत्रण देवून नंतर मागे घेणे हे अत्यंत चुकीचे आहे. हे दडपणाच्या प्रकारामुळेच घडले. याचा मी निषेध करतो. असे प्रकार व्हायलाच नको. साहित्य संमेलनात आतापर्यंत विविध ठिकाणी विविध कलावंत व विविध भाषिक कलावंतांना बोलविण्यात आले आहे. भाषा व कलाप्रकार अस भेद केला गेला नाही. जळगावात १९८४ मध्ये झालेल्या संमेलनात हिंदी साहित्यिका महादेवी वर्मा यांना बोलविण्यात आले होते. पुण्यात अमिताभ बच्चन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ही परंपरा असताना आताच का प्रश्न निर्माण झाला? असे प्रकार होणे चुकीचेच आहे.प्रश्न- सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्यानंतर साहित्यिकांनी संमेलनावर बहिष्कार टाकणे योग्य वाटते का?सहगल यांंना निमंत्रण दिल्यावर ते रद्द करणे हा केवळ त्यांचाच अपमान नाही. तर साहित्य संमेलनात जे दमनाचे प्रकार होत आहे, त्याद्वारे इतर सर्व साहित्यिकांचा अपमान झाल्यासारखे आहे. या विरुद्ध सर्वच साहित्यिकांनी आवाज उठवणे गरजेचे आहे.संमेलनाच उपस्थित न राहण्याचा निर्णय हा अगदी योग्य असून सर्वांची निषेधही केला आहे.आपण स्वत : साहित्य संमेलनाला जाणार आहात का?झालेला प्रकार निंदनीय असल्याने त्या विरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटणे आवश्यक आहे, असे मला वाटत असताना मी साहित्य संमलेनास जाण्याचा प्रश्नच नाही. झालेल्या प्रकाराचे समाजात उमटणारे पडसाद योग्य असून साहित्यिकांनी संमेलनास न जाणेच योग्य आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राजकीय हस्तक्षेप होतो असे वाटते का?सुरवातीस सहगल यांना निमंत्रणे देणे व नंतर ते परत घेणे यामागे निश्चितच हस्तक्षेप आणि दबावाचा प्रकार असून या मागे राजकीय शक्ती आहेच, परंतु त्यांनी छुप्या पद्धतीने हस्तक्षेप केला. संमेलनात काय बोलावे व काय बोलू नये, भाषा प्रांतवाद अशा गोष्टींवर आक्षेप घेतला जावू लागला आहे. आधी चुकीचा हस्तक्षेप करायचा व विरोधात प्रतिक्रिया आल्यावर सारवासारव करण्याला काहीच अर्थ नाही. आधीच विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मत अशोक कोतवाल यांनी व्यक्त केले.
...हा तर एकप्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:46 PM
-अशोक कोतवाल
ठळक मुद्देदमनाच्या प्रकाराविरुद्ध निषेध नोंदवणे गरजेचेच; इतर साहित्यिकांचाही हा अपमानच