जळगाव : माझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे, कोणाला दोष देवू नका..बेवारस समजून माझा मृतदेह कचराकुंडीत टाका...अशा आशयाची चिठ्ठी लिहून राजेश हिंमत मकवाना (४०) या पेंटर काम करणाºया तरुणाने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजता उघडकीस आली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश मकवाना हा तरुण पेंटर काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा. पत्नी रेखा, मुलगा विकास (१९), राहूल (१६) व देवेंद्र (१४) अशासंह हरविठ्ठल नगरात वास्तव्यास होता. पत्नी रेखा मुलांसह धरणगाव येथे माहेरी गेली होती. त्यामुळे राजेश एकटाच घरी होता. मोठा मुलगा विकास उर्फ विक्की दुपारी घरी आला असता घरात पत्र्याच्या खोलीत वडील राजेश याने साडीने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याने तत्काळ ही माहिती इतर काका व आईला कळविली. रामानंद नगर पोलीस स्टेशनचे मनोज इंद्रेकर व गणेश देसले यांनी घटनास्थळ गाठले. मृतदेहाजवळ एक चिठ्ठी आढळून आली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान, विवेक बापू मोरे (२६, रा.शिवकॉलनी) याच्या माहितीवरुन रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
माझा मृतदेह कचराकुंडीत टाका...अशी चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 5:49 PM
माझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे, कोणाला दोष देवू नका..बेवारस समजून माझा मृतदेह कचराकुंडीत टाका...अशा आशयाची चिठ्ठी लिहून राजेश हिंमत मकवाना (४०) या पेंटर काम करणाºया तरुणाने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजता उघडकीस आली.
ठळक मुद्दे राहत्या घरात गळफासहरिविठ्ठल नगरातील घटना