जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा व राष्ट्रवादीच्या नंदुरबार निरीक्षक प्रा. मीनाक्षी रमेश चव्हाण यांनी सिंगल वुमन फाउंडेशनची स्थापना केली. सिंगल वुमनसाठी कार्यरत राहणाऱ्या या फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षपदी प्रा. मीनाक्षी चव्हाण आहेत. या फाउंडेशनच्या कार्यकारिणीत उपाध्यक्षा प्रा. मंगला शिंदे, सचिव चेतना पाटील, सदस्या वंदना पाटील, सगुणा पाटील, मेघना देसाई, रेखा पाटील, वंदना मधुकर पाटील, संदीपा वाघ यांचा समावेश आहे.
शिंपी समाजातर्फे समृद्धी संतचा सत्कार
जळगाव : येथील एम.जे. कॉलेजची विद्यार्थिनी समृद्धी संत हिला नवी दिल्ली येथे २६ जानेवारी २०२१ रोजी प्रजासत्ताक दिन, राजपथावरील पथसंचलनाचे नेतृत्व करण्याचा बहुमान मिळाला. त्याबद्दल तिचा जळगाव शहर शिंपी समाज हितवर्धक संस्था व जळगाव जिल्ह्याच्या वतीने तिचा घरी जाऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी जळगाव जिल्हा शिंपी समाजाध्यक्ष दत्तात्रेय कापुरे, जळगाव शहराध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे, उपाध्यक्ष विवेक जगताप, माजी युवक अध्यक्ष मनोज भांडारकर, दिलीप सोनवणे, शैलेंद्र सोनवणे, शरद कापुरे आदी उपस्थित होते.