शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
3
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
4
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
5
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
6
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
8
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
9
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
11
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
12
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
13
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
14
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
15
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
16
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
17
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
19
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
20
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

माणुसकीवरच प्रश्चचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 1:12 PM

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘आरसा मनाचा’ या सदरात लिहिताहेत जळगाव येथील विलास भाऊलाल पाटील...

‘भर रस्त्यात, ज्यांचे नाव घेण्यात आम्ही स्वत:ला धन्य समजतो अशा छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर दोन मस्तवाल गावगुंड एका असाह्य तरुणीला बदडत असतील आणि सभोवतालचा नपुंसक समाज उघड्या डोळ्यांनी फक्त गंमत पाहतो.या जमावात सामान्य माणसापासून तथाकथित राजकीय पदाधिकारी, माध्यम प्रतिनिधी यांचाही समावेश असतो. ही अत्यंत दुर्दैवी, लाजीरवाणी आणि आम्ही माणूस असण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आहे. ही एकच नव्हे अशा असंख्य घटना आमच्या सभोवताली रोज घडत असतात आणि मला माझ्या माणुसपणाची लाज वाटते नव्हे तर घृणा येते. अशा माणुसपणाला पशुची किंवा जनावरांची उपमा देणे हासुद्धा मला त्या मुक्या जिवांचा अपमान वाटतो. कारण आजचा तथाकथित माणूस जसा वागतो आहे तसा पशुसुद्धा कधी वागत नाही. जनावरालाही एक निसर्ग निर्मित चौकट आहे आणि अपवादात्मक परिस्थिती वगळता ही चौकट तो कधीच मोडत नाही. पण तथाकथित माणसाने सर्वच चौकटी मोडून कधीच भंगाराच्या भावात विकून टाकल्या आहेत.आजच्यापेक्षा कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा काळ कितीतरी पट चांगला होता. तरीसुद्धा त्यांच्या काळातील माणुसकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाही संवेदनशील माऊली म्हणते-‘पाहिसन माणसाचे व्यवहार उफराटे, तव्हा बोरी बाभळीच्या अंगावर आले काटे’ !आणि मग ही माऊली एक टोकदार प्रश्न विचारते, ‘अरे माणसा-माणसा कव्हा होशीन माणूस?’ छत्रपती शिवरायांचे पोवाडे गाणारे आम्ही, कोरडी पोळी घेऊन जाणाऱ्या कुत्र्याच्या मागे, तुपाची वाटी घेऊन धावणाºया आणि मरणासन्न गाढवाला गंगेचे पाणी पाजणाºया संत एकनाथ महाराजांचा जयघोष करत कथा कीर्तनात नाचणारे आम्ही, ‘खरा तो एकचि धर्म-जगाला प्रेम अर्पावे ! ही पूज्य सानेगुरूजींची प्रार्थना रोज शाळेत उच्चारून म्हणणारे आम्ही.‘हिच अमुची प्रार्थना अन् हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ असे साळसुदपणे आळवणारे आम्ही. आमचा खरा माणुसकी धर्म कधीच विसरून गेलो आहोत. उपासना पद्धतीला धर्म ठरवून त्यासाठी रक्तपातासह सिद्ध असणारे आम्ही. ‘खºया माणुसकी धर्माला’ पार विसरुन गेलो आहोत. मी उच्च पातळीवरच्या किंवा अध्यात्मिक पातळीवरच्या माणुसकी धर्माबद्दल अजिबात बोलत नाहीये. मी रोजच्या व्यवहारातल्या साध्या साध्या गोष्टीबद्दल बोलतो आहे. समाजात, शेजारी-पाजारी, गल्लीत, गावात एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही कसे राहतो? कसे वागतो? याचा विचार तर करा! आई, वडील, गुरूजन, ज्येष्ठ नागरिक, महिला यांचा सन्मान करणे ही माणुसकी, सुसंस्कृतपणा. पण जे जमत नसेल तर निदान त्यांचा अपमान तरी करू नका. गर्दीच्या ठिकाणी प्रवासात, सार्वजनिक ठिकाणी वृद्ध नागरिक, महिला, अंध, अपंग, लहान मुले यांच्याशी थोडी तरी सौजन्याची वागणृक ठेवा. त्यांना ढकलू नका, धक्का मारून पुढे जावू नका, किमान एवढे तर सौजन्य ठेवा. गर्दीत आपले वाहन पुढे दामटणे, रेल्वेगेट उघडल्यावर अतीघाईने वाहन पुढे घुसवण्याचा प्रयत्न करणे, चालत्या वाहनातून, मोटारबाईकवरून गुटखा खावून पचकन थुंकणे आणि कुणी बोलले तर त्याला शिवीगाळ करणे, धमकावणे ही संस्कृती तरी नका बनवू. तरुण मुले आणि तरुण मुली आज बिनदिक्कतपणे शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक बगीचे, रस्ते या ठिकाणी बिभत्स वर्तन करताना महिला, ज्येष्ठ नागरिक, शिक्षक यांचे भान ठेवणे तर सोडाच पण उलट त्यांना निर्लज्जपणे सामोरे जातात. निदान ते तरी करू नका. व्हीडीओ शुटींग आणि फोटोग्राफीमध्ये धन्यता मानली जाते. यामुळे आम्ही माणूस आहोत का? या गोष्टीवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.आजच्यापेक्षा कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा काळ कितीतरी पट चांगला होता. तरीसुद्धा त्यांच्या काळातील माणुसकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाही संवेदनशील माऊली म्हणते-‘पाहिसन माणसाचे व्यवहार उफराटे, तव्हा बोरी बाभळीच्या अंगावर आले काटे’ !आणि मग ही माऊली एक टोकदार प्रश्न विचारते, ‘अरे माणसा-माणसा कव्हा होशीन माणूस?’ आज तर काळ खूपच बदलला आहे आणि बहिणाबार्इंचा हा प्रश्न अधिकच टोकदार झाला आहे. आमचा माणुसकी धर्म कधीच विसरून गेलो आहोत.- विलास भाऊलाल पाटील, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव