जळगाव : केरळात पुन्हा पाच रूग्ण आढळून आल्याने जिल्हा परिषद सदस्यांचा संभावित केरळ दौºयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.केरळ येथे या आधी कोरोनाचे तीन रूग्ण आढळून आले होते़ त्यानंतरही यशदातर्फे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे काही सदस्य व अधिकाऱ्यांचा केरळ अभ्यास दौºयाचे नियोजन करण्यात आले होते़ सर्व बुकींगही करून ठेवण्यात आल्या आहेत़ मध्यंतरी याबाबत चाचपणी सुरू झाली होती़ मात्र, केरळात पुन्हा पाच रूग्ण सापडल्यामुळे आता हा २२ मार्च रोजीचा दौरा रद्द होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत़ अद्याप तसे वरिष्ठ पातळीवरून काही आदेश नाहीत मात्र, दौरा रद्दच होईल, अशी शक्यता अधिकाºयांकडूनही वर्तविण्यात आली आहे़कोरोना विषाणूबाबत अधिकाधिक जनजागृती व्हावी या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागातर्फे लवकरच हस्तपत्रके वाटप करण्यात येणार आहे़
जिल्हा परिषद सदस्यांच्या केरळ दौऱ्यावर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2020 11:39 AM