आॅनलाईन लोकमतअमळनेर,दि.५ : चार महिन्यात पाडळसे धरणाचे काम न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा पाडळसे जनआंदोलन समितीतर्फे सुभाष चौधरी यांनी मुक मोर्चाला संबोधित करताना शासनाला दिला.पाडळसे धरण जन आंदोलन समितीतर्फे गुरुवारी बजरंग पॅलेस पासून प्रांत कचेरीवर मूक मोर्चा काढण्यात आला. रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता मोर्चात अमळनेर, चोपडा आणि धरणगाव तालुक्यातील सुमारे सहा हजार नागरिकांनी यात सहभागी घेतला. मूक मोर्चा निमित्त शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान सुभाष चौधरी यांचे भाषण सुरू असताना आमदार स्मिता वाघ यांच्या भ्रमणध्वनीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा फोन आला त्यांनी मुकमोर्चा तील सहभागी आंदोलनकर्त्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधला. पाडळसे धरण बाबत शासन गंभीर असून २०१९ पर्यंत धरण पूर्ण करू, त्यासाठी वेगवेगळ्या योजनेत या प्रकल्पाचा समावेश करू, तसेच पुढील आठवड्यात मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सोबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले.दरम्यान, मोर्चाच्या मार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नागरिकांनी, व्यापारी बांधवांनी केली. मोर्चा नंतर धरण संघर्ष समिती ने प्रांताधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन दिले. यावेळी आमदार शिरीष चौधरी, भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ, तहसीलदार प्रदीप पाटील, कार्यकारी अभियंता आर.जी.पाटील, अॅड तिलोत्तमा पाटील उपस्थित होते.
अमळनेरात प्रलंबित पाडळसरे प्रकल्पाचा प्रश्न पेटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 4:43 PM
अमळनेर, धरणगाव व चोपडा तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर
ठळक मुद्देधरण संघर्ष समितीने दिली चार महिन्यांची मुदतजलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी निधीसाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये समावेश करण्याचे दिले आश्वासनआपल्या विविध मागण्यांचे दिले प्रशासनाला निवेदन