अजय पाटीलजळगाव - महापौरपदासाठी १९ सप्टेंबर रोजी विशेष सभा घेण्यात येणार असून, याच सभेत महापौरांची निवड केली जाणार आहे. भाजपाचे स्पष्ट बहुमत असून महापौरपद कोणाला मिळते याबाबत उत्सुकता वाढली आहे. भाजपाकडून पहिले अडीच वर्ष महापौरपदाची संधी भाजपातील निष्ठावंत व अनुभवी उमेदवाराला देण्यात येणार आहे.निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केलेल्या उमेदवाराला महापौरपदाची पहिल्यांदा संधी मिळणार नसल्याची शक्यता आहे.महापौरपदासाठी सुरुवातील आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे यांच्यासह भारती सोनवणे, सिंधूताई कोल्हे यांच्या नावांची चर्चा होती. मात्र, भारती सोनवणे या सुरुवातीला जरी भाजपात असल्या तरी त्यांनी मध्यंतरी भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. गेल्या दोन पंचवार्षिक त्या शहर विकास आघाडी व खान्देश विकास आघाडीकडून निवडून आल्या होत्या. निवडणुकीच्या तोंडावर त्यांचे पती कैलास सोनवणे व त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्याच प्रमाणे सिंधूताई कोल्हे यांनी देखील निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केल्यामुळे त्यांना देखील संधी मिळणे कठीण आहे. भाजपा कार्यकारणीच्या बैठकीत यावर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एक-दोन टर्म विजयी झालेल्या मुळ भाजपाची पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला यामुळे संधी मिळण्याची शक्यता आहे.एक व्यक्ती एक पद यासाठी भाजपामधून आग्रहसध्या सीमा भोळे व उज्वला बेंडाळे या दोघांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, भाजपाच्या ‘पार्टी विथ डिफरन्स’ प्रमाणे एक व्यक्ती एक पद नुसार सीमा भोळे यांना विरोध देखील होत आहे. सुरेश भोळे हे जळगाव शहराचे आमदार असून, जिल्हा बॅँक व दूध संघात देखील ते संचालक आहेत. तसेच महानगराध्यक्षाचे पद देखील त्यांच्याकडे आहे. त्यामुळे महापौरपद देखील त्यांच्या पत्नीला देताना पक्ष नेतृत्वाला विरोधाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तर उज्वला बेंडाळे या ओबीसी प्रवर्गातूनच विजयी झाल्या असून, त्यांची ही दुसरी टर्म आहे. त्यामुळे उज्वला बेंडाळे यांना संधी मिळण्याचीही शक्यता वाढली आहे.
जळगावात सीमा भोळे आणि उज्वला बेंडाळे महापौरपदाच्या शर्यतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 7:50 PM
महापौरपदासाठी १९ सप्टेंबर रोजी विशेष सभा घेण्यात येणार असून, याच सभेत महापौरांची निवड केली जाणार आहे. भाजपाचे स्पष्ट बहुमत असून महापौरपद कोणाला मिळते याबाबत उत्सुकता वाढली आहे.
ठळक मुद्देनिवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केलेल्यांना संधी नाहीमहापौरपदासाठी १९ सप्टेंबर रोजी विशेष सभापहिले अडीच वर्ष मिळणार निष्ठावंतांना संधी