आॅनलाईन लोकमतकुऱ्हाड, ता.पाचोरा, दि. ८ - अवैध दारुविक्री करणाऱ्या दोन व्यवसायीकांमध्ये झालेल्या हाणामारी व बोकाळलेले अवैध धंदे त्यात जुगार, सट्टा, दारु हे बंद व्हावेत या मागणीसाठी चारशे ते पाचशे ग्रामस्थांनी सोमवार ८ रोजी सकाळी बसस्टँड परिसरात रास्ता रोको आंदोलन केले व टायर जाळुन प्रशासनाचा निषेध केला.या मुळे या भागातील बस व इतर वाहतुक ठप्प झाली होती. यामुळे बाहेर गावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल झालेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी येत नाही तोपर्यत हे आंदोलन सुरुच होते.घटनास्थळी पिंपळगाव पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे अतिरीक्त पोलीस कुमक सह दाखल झाले. त्यांनी अवैध धंद्यांबाबत चर्चा करून लेखी निवेदन स्विकारले. अवैध धंदे कायमस्वरुपी बंद करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
कुऱ्हाड येथे अवैध धंदे बंद करण्यासाठी रास्तारोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 5:06 PM
नागरिकांनी रस्त्यावर टायर जाळून केला पोलीस प्रशासनाचा निषेध
ठळक मुद्देअवैध दारू विक्रीवरून रविवारी रात्री दोन जणांमध्ये झाली होती हाणामारीअवैध धंदे बंद करावे या मागणीसाठी नागरिकांनी केला रास्तारोकोपोलिसांना लेखी निवेदन देत केले आंदोलन