जळगाव : भाजप-सेना युती सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांच्या पडताळणीचा धडाका उद्धव ठाकरे सरकारने लावला आहे. सरकारच्या या कृतीमुळे राज्याच्या विकासाला खीळ बसण्याचा धोका आहे. राज्याच्या विकासाचा वेग मंदावणे या सरकारला परवडणारे नाही, अशा शब्दात भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.भाजपची जळगावात उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला विखे पाटील उपस्थित होते. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे सरकारच्या निर्णय प्रक्रियेला लक्ष केले. ते म्हणाले की, जनतेने आम्हाला कौल दिलेला असल्याने आम्हाला उत्तर तर द्यावे लागेल, त्यामुळे योग्य वेळी निर्णय होईल, 'जास्त दिवस आम्ही विरोधात बसणार नाही' या त्यांच्या वक्तव्याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी हे उत्तर दिले़
ठाकरे सरकारच्या कृतीमुळे विकासाला खीळ बसण्याचा धोका - राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 12:38 PM