जळगाव : एम.बी.ए. फायनान्स अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या रागिणी केशरी या विद्यार्थिनीला सोमवारी प्रतिभा वसंत नारखेडे सुवर्णपदक प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेतील एम.बी.ए. (फायनान्स) या अभ्यासक्रमात प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीस प्रतिभा वसंत नारखेडे सुवर्णपदक दिले जाते. सन २०२०-२१ मधील हे सुवर्णपदक रागिणी केशरी हिला एम.बी.ए.(फायनान्स) अभ्यासक्रमात प्रथम आल्याबद्दल बुधवार, ७ जुलै रोजी देण्यात आले. यावेळी व्यवस्थापन प्रशाळेचे संचालक डॉ. अनिल डोंगरे, प्रा.डॉ. समीर नारखेडे, प्रा.डॉ. मधुलिका सोनवणे, प्रा.डॉ. रमेश सरदार, प्रा.डॉ. पवित्रा पाटील, प्रा.डॉ. आर.आर.चव्हाण, प्रा.डॉ. अुतल बारेकर, प्रा.डॉ. मिलिंद धनराज, प्रा. हर्षल नेरकर, भरत पालोदकर, कैलास सोनवणे उपस्थित होते.