भुसावळ : शहरातील जाममोहल्ला भागात माजी नगरसेवक सलीमखान तस्लीमखान यांच्या ताब्यातील घरात सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल १६ आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. यातील १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. चार आरोपी फरार आहेत. ही कारवाई शनिवारी रात्री उशिरा करण्यात आली आहे. यासंदर्भात बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींमध्ये माजी नगरसेवक सलीमखान तसलीमखान, वसीमखान सलीमखान, असलमखान तसलीमखान , कादरखान सिकंदरखान, जमीलखान फिरोजखान, शेख मुक्तार शेख गफ्फार, शब्बीर अली सुपडूअली, नूर मोहम्मद सोहेल मोहम्मद, मेहमूद इब्राहीम खाटीक, बाबरखान अन्वरखान, रहीस शहीद बागवान, शमीजबी उल्लाखान, शेख रशीद शेख हुसेन, अन्वर शेख अखिल शेख या आरोपींचा समावेश आहे. यातील १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर सलीमखानसह चार आरोपी फरार आहे. या कारवाईमुळे शहरात जुगाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.ही कारवाई डीवायएसपी गजानन राठोड , पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी केली आहे. यात सुमारे सहा हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहे. पो.कॉ.किशोर महाजन यांनी फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे तपास करीत आहे.
माजी नगरसेवकाच्या घरात सुरू असलेल्या जुगारावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 10:17 PM
जाममोहल्ला भागात माजी नगरसेवक सलीमखान तस्लीमखान यांच्या ताब्यातील घरात सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकून पोलिसांनी १६ आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
ठळक मुद्दे१२ आरोपींना अटक : चार फरारशहरात खळबळ : डीवायएसपींची कारवाई