कर्नाटक राज्य मध्ये जाणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर रिपोर्ट अनिवार्य
जळगाव : जळगाव विभागातून कर्नाटक राज्य मध्ये जाणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणीचा आरटीपीसीआर रिपोर्ट आणणे अनिवार्य करण्यात आले आहे. भुसावळ विभागातून कर्नाटक मध्ये जाणाऱ्या प्रवाशांनी हा रिपोर्ट सोबत ठेवण्याचे आवाहन भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
रेल्वे स्थानकावर थंड पाणी मिळत नसल्याने प्रवाशांची गैरसोय
जळगाव : जळगाव रेल्वे स्थानकावर सध्या उन्हाळा सुरू असतांनाही प्रवाशांना स्टेशनवरील पिण्याच्या टाक्यांमधून साध्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने तात्काळ या टाक्यांमधील थंड पाण्याचे कुलर सुरु करावे अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
जुन्या बस स्थानकात पथदिवे बसविण्याची मागणी
जळगाव : शहरातील जुन्या बस स्थानकातून गेल्या आठवडयापासून बससेवा पुन्हा सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील बसेस या आगारातून सोडण्यात येत असल्याने नागरिकांची वर्दळ वाढली आहे. मात्र,आगारात रात्रीच्या वेळी पुरेसे पथदिवे नसल्यामुळे अनेक ठिकाणी अंधार पसरलेला असतो. त्यामुळे आगार प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व ठिकाणी पथदिवे बसविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
रस्त्यावरील बेशिस्त वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
जळगाव : शहरातील टॉवर चौकातून चित्रा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बेशिस्तरित्या कार व रिक्षा पार्किंग करण्यात येत असल्यामुळे दररोज वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. यामुळे रस्त्यावरून जणाऱ्या नागरीकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी मनपा प्रशासनाने या वाहन धारकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.