बोदवड, जि.जळगाव : भाजप उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचार गाडीने बोदवड येथील रेल्वेचे बंद गेट उडविले. रविवारी दुपारी अडीचला ही घटना घडली. रेल्वे प्रशासनाने हे वाहन जमा केल्याचे समजल्यानंतर कार्यकर्त्यांनी राडा केला. यानंतर प्रचार गाडीच्या चालकाने नुकसानीची जबाबदारी स्वीकारल्यानंतर वाहन सोडण्यात आले.बोदवड-मुक्ताईनगर रस्त्यावर बोदवड रेल्वेस्थानकावर रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास रेल्वेगेट बंद होते. तेव्हा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांचे प्रचार करणारे वाहन (क्रमांक एमएच-०१-एलए-२०२३) हे बंद गेटवर आदळले. त्यात रेल्वेगेटचा दांडा तुटला. तेव्हा कर्तव्यावर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याने ती गाडी अटकवली व रेल्वेच्या हद्दीत जमा केली. काही वेळाने ही घटना भाजपच्या कार्यकर्त्यांना समजली. कार्यकर्त्यांनी रेल्वेस्थानकावर येत गाडी सोडण्याची मागणी केली. तेव्हा रेल्वे पोलिसांतर्फे नकार देण्यात आल्याने शाब्दिक चकमक झाली. शेवटी प्रचार गाडी चालवणारा चालक शेख इसाक (वय २८, रा.मुक्ताईनगर) याने ही चूक माझ्या हाताने झाली असून, मी भरपाई करण्यास तयार असल्याचे सांगितले. यानंतर प्रचार गाडी सोडून देण्यात आली.याबाबत रावेर लोकसभेच्या मुक्ताईनगर मतदारसंघाचे प्रसिद्धीप्रमुख भगतसिंग पाटील यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क केला असता त्यांनी बोलणे टाळले.
भाजपच्या प्रचार गाडीने तोडले रेल्वेगेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 6:38 PM
भाजप उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचार गाडीने बोदवड येथील रेल्वेचे बंद गेट उडविले. रविवारी दुपारी अडीचला ही घटना घडली. रेल्वे प्रशासनाने हे वाहन जमा केल्याचे समजल्यानंतर कार्यकर्त्यांनी राडा केला.
ठळक मुद्देरेल्वे प्रशासनाने गाडी जमा करताच कार्यकर्त्यांनी केला राडाचालकाने स्वत:वर घेतली जबाबदारी अन् सोडले वाहन