शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

रेल्वे सुरक्षा बलाची तिकीट दलालांविरोधात मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 16:41 IST

रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) रेल्वे आरक्षणाच्या तिकिटांची दलाली रोखण्यासाठी व प्रवाशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या विरुद्धच्या  मोहिमेस तीव्र केले आहे.

ठळक मुद्देमहिला प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी ‘मेरी सहेली’  उपक्रम आरपीएफचे पथक दैनिक  व साप्ताहिक विशेष गाड्यांसह सरासरी २५ गाड्यांमधून एस्कॉर्टिंग करतात

भुसावळ : रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) रेल्वे आरक्षणाच्या तिकिटांची दलाली रोखण्यासाठी व प्रवाशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या विरुद्धच्या  मोहिमेस तीव्र केले आहे.  लॉकडाऊन कालावधीत आणि त्यानंतर अनलॉक कालावधीत रेल्वेने विशेष गाड्या वर्गीकृत पद्धतीने चालवण्यास सुरुवात केली आहे.  या विशेष  गाड्यांमध्ये अनेक वैयक्तिक ओळखपत्र (आयडी) वापरून आरक्षण करणे आणि आरक्षित जागा बळकावण्यासाठी ई-तिकिटांच्या  तक्रारी प्राप्त होण्यास सुरुवात झाली.    मध्य रेल्वेच्या आरपीएफ टीमने तातडीने कारवाई केली आणि सायबर सेलकडून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे व इतर सूत्राकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे छापे टाकण्यास सुरवात केली.  मध्य रेल्वेच्या पाचही विभागात हे छापे टाकण्यात आले. त्यातील बहुतांश खासगी प्रवासी एजन्सींच्या आवारात होते.  नोव्हेंबर २०२० पर्यंत रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अन्वये तिकीट दलालीचे १७४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रेल्वे मालमत्तेचे संरक्षण करण्याव्यतिरिक्त, या कोविड साथीच्या आजाराच्या काळात मध्य रेल्वेची आरपीएफ टीम रेल्वेच्या सामाजिक बांधीलकीच्या प्रत्येक बाबीत अग्रभागी कोरोना योद्धा म्हणून उभे राहिली आहे.मुखपट्टी परिधान करणे आणि सोशल डिस्टन्सिंग राखणे यासारख्या कोविड-१९  प्रोटोकॉलचे पालन सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचे नियमन आणि मार्गदर्शन करण्यात आरपीएफची टीम सक्रियपणे कार्यरत आहे.  अल्पवयीन मुलांची सुटका करून त्यांना त्यांच्या कुटुंबीयाशी पुन्हा एकत्र आणणे, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्यात मदत करणे;  वेळेवर वैद्यकीय सहाय्य करून आणि अर्भकांसाठी दुधाची व्यवस्था करून तसेच गर्भवती महिलांना ट्रेनमध्ये चढण्यास मदत करणे; अमली पदार्थ, मद्य वगैरे जप्त करून गुन्हेगारांवर नजर ठेवणे;   गाड्यांमध्ये राहिलेल्या मौल्यवान/वस्तू असलेल्या पिशव्या/बॅग्स शोधून काढणे आणि योग्य पडताळणीनंतर त्या मालकांकडे परत करणे.   ट्रेनमध्ये  चढताना किंवा उतरताना  खाली पडलेल्या  प्रवाशांचे प्राण वाचविण्याचे  कामही आरपीएफ टीमने केले आहे.महिला प्रवाशांना विशेषतः एकट्या प्रवास करताना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेच्या आरपीएफ चमूने नुकतीच ‘मेरी सहेली’ उपक्रमही सुरू केला आहे. या ऑपरेशन अंतर्गत, आरपीएफचे पथक दैनिक  व साप्ताहिक विशेष गाड्यांसह सरासरी २५ गाड्यांमधून एस्कॉर्टिंग करतात.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ