शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीसह देशातील सर्व CRPF शाळांमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी, पोलिसांनी सुरक्षा वाढवली
2
नवी मुंबईत भाजपाला धक्का! तिकीट नाकारताच संदीप नाईक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत
3
60 वर्षांचे झाले अमित शाह; किती आहे त्यांची नेटवर्थ अन् कोणकोणत्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक? जाणून घ्या
4
"४८ तासांत रोख रक्कम..."; सुकेश चंद्रशेखरची करण जोहरला मोठी ऑफर, जॅकलिनचंही घेतलं नाव
5
"माझ्याविरोधात मोदी, शाहांच्या सभा घ्या, मला आघाडी वाढवायला मदत होईल’’, रोहित पवारांचा टोला 
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निलेश राणेंचं ठरलं! धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ विधानसभा मतदारसंघातून लढणार
7
७ लाख रुपयांचा जीवन विमा तीन वर्षांसाठी मिळेल मोफत; EPFO ​​ने १२ महिने सतत सेवेची अटही हटवली
8
Paytm Q2 Result : पेटीएमला झाला ९३० कोटी रुपयांचा नफा; तरी का ८% आपटले शेअर्स? कारण काय? 
9
निवडणुकीपूर्वी अजित पवारांना 'सुप्रीम' दिलासा; घड्याळ चिन्हाबाबत कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय! 
10
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी Team India ची घोषणा; ऋतुराज गायकवाड कर्णधार, किशनचीही एन्ट्री
11
Gold Silver Rates Today : सोन्याची किंमत नव्या शिखरावर, चांदीही लाखाच्या पार; खरेदीपूर्वी पाहा १८ ते२४ कॅरेट सोन्याचे दर
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : " सापडलेल्या पाच कोटी प्रकरणी संजय राऊतांची चौकशी व्हावी,", अजितदादांच्या नेत्याने केली मागणी
13
इनोव्हामध्ये ५ कोटींची रोकड सापडली, पण कारमालकाने केला वेगळाच दावा; जबाबदारी झटकत म्हणाला...
14
आचारसंहितेचं उल्लंघन होतंय; मग करा 'सी-व्हिजिल एप'वर तक्रार!
15
ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, इमारत कोसळली, ९ कर्मचारी गंभीर जखमी 
16
"मी यापुढे कधाही.."; प्रभासला 'जोकर' म्हणाल्यानंतर ट्रोल झालेल्या अर्शद वारसीचं मोठं विधान, म्हणाला-
17
महागाईचा सामना करण्यासाठी सरकारला अंबानींची साथ; Reliance Retailमध्ये मिळणार स्वस्त डाळ, तांदूळ?
18
जळगावमधील उद्धव सेनेचे इच्छुक मुंबईत ठाण मांडून, मविआच्या जागांचा फैसला होईना...
19
माझ्या बापाविषयी बोलाल तर खबरदार, तुमचे काय वाईट केले: जयश्री थोरात यांचा पलटवार
20
मॉडेलिंगचं स्वप्न, १५ वर्षे मोठ्या अधिकाऱ्यासोबत लग्न, घटस्फोटानंतरही राहत होते एकत्र, आता सापडला तरुणीचा मृतदेह  

रेल्वे भुयारी मार्गाला सापडला मुहूर्त; शेतकऱ्यांचा मार्ग सुकर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2023 7:12 PM

भादली रेल्वे गेटजवळ कामास सुरुवात : सात गर्डर टाकले, १५ एप्रिलपर्यंत होणार काम पूर्ण

जळगाव : गेल्या सहा वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे रखडलेल्या भादली रेल्वे गेट क्रमांक १५३ या ठिकाणी भुयारी मार्ग करण्याचा अखेर मुहूर्त सापडला असून या कामाला सुरूवात झाली आहे. या मुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून या मार्गासाठी सात गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले असून आरसीसी बॉक्स टाकण्यासाठी खोदकाम सुरू झाले आहे. हे काम १५ एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 

रेल्वे विभागाने सन २०१७मध्ये भादली रेल्वे गेट क्रमांक १५३ कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यावेळी ‘लोकमत’ने भादली रेल्वे फाटक बंद झाल्यास उद्भवणाऱ्या समस्यांविषयीचा पूर्ण लेखाजोखा मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. सोबतच नशिराबाद येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत आवाज उठविला होता. रेल्वे फाटक बंद न करता आहे त्याच ठिकाणाहून भुयारी मार्ग करण्यास रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदील दिल्यानंतर नशिराबादकरांना दिलासा मिळाला. मात्र अनेक वर्षे उलटूनही कामाला सुरुवात होत नव्हती. यामुळे  नशिराबादसह परिसरातील शेतकऱ्यांना लांबच्या मार्गाने शेतात ये-जा करावी लागत आहे. या विषयी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्यासह गावातील अन्य लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी खासदार उन्मेष पाटील यांची भेट घेऊन भादली रेल्वे गेट फाटकाच्या समस्येबाबत व्यथा कथन केली. खासदार  पाटील यांनी  प्रत्यक्ष पाहणी करून मुंबई येथील रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. 

मान्सूनपूर्वी मार्ग होणार खुला?या ठिकाणी आतापर्यंत एकूण सात गर्डर टाकण्यात आले आहे. आरसीसी बॉक्स टाकण्यासाठी माती खोदण्याचे काम सध्या सुरू आहे.  येत्या १५ एप्रिल पर्यंत भुयारी मार्गाचे काम पूर्णत्वास येईल, अशी माहिती रेल्वे निर्माण विभागाचे  उपअभियंता पंकज धाबारे यांनी ‘लोकमत’ला दिली. येत्या मान्सूनपूर्वी हा मार्ग खुला करता यावा यासाठी प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी पोकलेनच्या साह्याने खोदकाम सुरू असून मजुरांकडूनही या ठिकाणी काम सुरू आहे. 

खासदारांचे खडे बोल२५ फेब्रुवारी रोजी डीआरएम, खासदार उन्मेष पाटील व नशिराबादच्या लोकप्रतिनिधींची बैठक झाली. खासदारांनी या कामास विलंब होत असल्याबद्दल संताप व्यक्त‍ करीत अधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला होता. बोगद्याचे काम होत नाही तोपर्यंत गेट खुले करा, अशा सूचना यावेळी दिल्या.  यानंतर तातडीने सुत्रे फिरली व कामाला सुरुवात झाली.  

भुयारी मार्गाला न्याय मिळाल्याचे समाधानजळगाव, जामनेर, पाचोरा, यावल या चार तालुक्यांना जोडणारा हा  मार्ग कायमस्वरूपी बंद होत असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार होते. भादली रेल्वे गेट परिसरात सुमारे दीड ते दोन हजार एकर जमीन नशिराबाद परिसरातील शेतकऱ्यांची आहे. ती कसण्यासाठी त्यांना अवघड झाले होते. या संदर्भात ‘लोकमत’ने सर्वप्रथम रेल्वे फाटक बंद झाल्यास उद्भवणाऱ्या समस्यांची व्यथा मांडली होती. भुयारी मार्गाबाबत तब्बल सहा वर्ष लढा दिल्यानंतर आज न्याय मिळाला याचे समाधान असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी सांगितले.भादली रेल्वे गेट संदर्भात कामाला गती यावी यासाठी विविध राजकीय पक्षांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी  प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध आंदोलने केले. अखेर त्याला यश आले आहे

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगावFarmerशेतकरी