शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

रेल्वेचे काम आता पेपरलेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 10:21 PM

कोरोनाचा असाही प्रभाव : ई-आँफिस माध्यमाचा अधिक वापर

भुसावळ : कोरोना ची भीती आज प्रत्येकाच्या मनात आहे , अविरत चालणारे रेल्वेचे चाक असो, विमानसेवा असो किंवा दळण-वळण असो क्षणात न दिसणाऱ्या अत्यंत सूक्ष्म विषाणूने सर्वांना थांबविले, याच बरोबर कोरोनाने निसर्गप्रेमदेखील शिकवले. भुसावळ रेल्वे विभागाचा मोठा तामझाम पेपरलेस होऊन प्रदूषण मुक्त झाला आहे. सध्या ई-आॅफिस च्या माध्यमातून भुसावळ रेल्वे भागाचे कार्य सुरू आहे.कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी मार्च २२ पासून जनता कर्फ्यू व त्यानंतर सातत्याने लॉकडाऊन लावण्यात आले. इतिहासात कधी न थांबणारी रेल्वे चाके कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थांबले.ज्यांच्याकडे अगदी मिनिटाचा वेळ नव्हता अशा सगळ्यांना निसर्गाने घरी बसविले. मात्र कोरोना सोबतच व्यवहार ,जनजीवन सुरळीत व्हावे याकरिता मनुष्याने पर्यायी मार्ग शोधून काढले. भुसावळ रेल्वे विभागात कागदावर होणारे संपूर्ण कार्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेपरलेस म्हणजे ई- आॅफिसच्या माध्यमातून सुरू आहेत.इगतपुरी ते अमरावती ५३७ किलोमीटर, इगतपुरी ते भुसावळ ३०८ किलोमीटर, अमरावती ते भुसावळ २२९किलोमीटर, इगतपुरी ते खंडवा ४३२ किलोमीटर व खंडवा -भुसावळ १२४ किलोमीटर या व्याप्तीच्या भुसावळ रेल्वे विभागात तब्बल ११९ रेल्वेस्थानक आहेत व या सर्व रेल्वे स्थानकावर कार्य ई आॅफिसच्या माध्यमातून केले जात आहे .पूर्वी कुठलेही कार्यालयीन कामे करण्यासाठी कागदाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत होता. एका फाईलमध्ये एका कागदाचे मठ्या प्रमाणात प्रतीलीपी करून लावावे लागत होते, यामुळे कागदाच्या वापराने पर्यावरणाचा ºहास होत होता, मात्र आता परिस्थिती बदलली आहे सर्व कामे ई- आॅफिस च्या माध्यमातून केली जात आहे .मोठ्या प्रमाणात लागणारे कागद वापरणे हा प्रकार इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे .भुसावळ विभागात मोठ्या प्रमाणात रेल्वेच्या विविध टेंडरचे कामे सुरू आहेत, आता हीे सर्व कामेही यशस्वीरित्या ई- आॅफिसच्या माध्यमातून करण्यात येत आहे.ई -आॅफिस च्या माध्यमातून कार्यात गतिमानता आली आहे. सुरक्षित व पारदर्शकपणे हे काम पर्यावरणपूरक होत असून ही काळाची गरज सुद्धा आहे.-आर. के. शर्मा, सीनियर डीसीएम, रेल्वे भुसावळ विभाग.