भुसावळ : कामगारविरोधी आदेश मागे घेण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे गुरुवारी येथील डीआरएम कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. कामगारांनी दिलेल्या घोषणांनी रेल्वे परिसर चांगलाच दणाणला.सायंकाळी पाच वाजता रेल्वेस्थानकाच्या उत्तर भागातून मोर्चाला सुरुवात झाली.व्हीआयपी रोडने तो डीआरएम कार्यालयाच्या प्रांगणात दाखल झाला.त्या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.सभेत सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे विभागीय अध्यक्ष व्ही.के. समाधिया, विभागीय सचिव एस.बी. पाटील, पीओएच शाखेचे सचिव पी.एन.नारखेडे, कोषाध्यक्ष तोरणसिंग, बी.आर.धाकडे, एस.एस. चौधरी, महिला शाखेच्या कुंदलता थूल यांची सरकारच्या कामगारविरोधी धोरणावर टीका करणारी भाषणे झाली. सभेनंतर डीआरएम सुधीर कुमार गुप्ता यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मोर्चात सुमारे एक हजाराच्यावर रेल्वे कामगार सहभागी होते. प्रसंगी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे बोर्डाने जारी केलेले 30 जानेवारी 2017 चे असंवैधानिक पत्र जसे संरक्षा संवर्गातील पर्यवेक्षक युनियनचे पदाधिकारी राहू शकत नाही, केवळ सदस्य म्हणून काम करू शकतात हा आदेश तातडीने मागे घेण्यात यावा. 4600 वेतनश्रेणीतील कर्मचा:यांना 4800 वेतनश्रेणीत समाविष्ट करण्यात यावे, ग्रुप ए श्रेणीतील पर्यवेक्षकांना ग्रुप ई (राजपत्रित)चा दर्जा देण्यात यावा, लोको पायलटला (मेल) 4800 वेतनश्रेणी देण्यात यावी, 1 जानेवारी 2006 च्या आधी रुजू झालेल्या लोको पायलट यांची ग्रेड वाढविण्यात यावी, महासंघाच्या मागणीनुसार 1 जानेवारी 2016 र्पयत अलाऊन्स देण्यात यावा आदी मागण्यांसाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे गुरुवारी मोर्चा काढण्यात आला.यांनी घेतले परिश्रम सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे विभागीय अध्यक्ष व्ही.के. समाधिया, विभागीय सचिव एस.बी.पाटील, तोरणसिंग, बी.आर.धाकडे, पी.एन.नारखडे, नंदू उपाध्याय, सलीम, आर.एन.चिखलकर, रायकवार, उमाकांत बावस्कर, ए.एस.राजपूत, एस.के.दुबे, किरण कोलते, व्ही.डी.चौधरी, पंकज गुप्ता, ए . जी. सोनवणे, अशोक पांडव यांनी मोर्चा यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
रेल्वे कामगारांच्या मोर्चाने परिसर दणाणला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2017 12:30 AM