भुसावळ : रेल्वेच्या सामग्री व्यवस्थापन विभागाने, मध्य रेल्वेच्या प्रत्येक विभाग, कार्यशाळा, शेड इत्यादी परिसर भंगार सामग्रीपासून मुक्त व्हावे यासाठी ‘झिरो स्क्रॅप मिशन’ सुरू केले. चालू वर्षात म्हणजेच एप्रिल -२० ते जानेवारी–२१ दरम्यान मध्य रेल्वेने रु. २२४.९६ कोटी भंगाराची विक्री केली. या भंगार सामग्रीमध्ये निरुपयोगी रूळ, रुळांचे साहित्य, मोडीत काढलेले डबे, वाघिणी आणि इंजिने इत्यादींचा समावेश आहे.झिरो स्क्रॅप मिशन मोहिमेमुळे केवळ भारतीय रेल्वेसाठी कमाई होत नाही तर त्याचा परिणाम अतिरिक्त जागेची उपलब्धततादेखील होते. वर्ष २०१९-२० या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने ५६०५७.१५ मे.टन वजनाच्या निरुपयोगी रूळ, रुळांचे साहित्य आदि भंगार साहित्याच्या विक्रीतून रुपये ३२१.४६ कोटी महसूल जमा केला होता.कोविड -१९ साथीच्या दरम्यान देशभरात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या मालगाड्या व पार्सल गाड्यांच्या इंजिनांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक असणारे सुटे भाग व इतर लागणाऱ्या वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित करण्यात सामग्री व्यवस्थापन विभागाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पीपीई किट्स , एन-९५ मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर्स इत्यादी वस्तू कर्मचार्यांना संसर्ग रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत, त्यासाठी अल्प कालावधीत निविदा काढून खरेदी करण्यात महत्त्वपूर्ण ठरले आहेत
रेल्वेने भंगार विक्रीतून मिळविले रुपये २२५ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 2:03 PM