भूषण श्रीखंडेजळगाव: भुसावळ बस स्थानक सन १९६९ पासून सुरू झाले तेव्हापासून आज पर्यंत रेल्वे स्थानकाच्या बाजुला असलेले बसस्थानकाचे प्रवेश द्वार भिंत बांधण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अचानक बंद केले आहे. अचानक रेल्वे प्रशासाने खड्डा खोदून हे प्रवेशद्वार बंद केल्याने एसटी विभाग रेल्वे प्रशासनाला देणार कायदेशीर नोटीस देणार आहे.
भुसावळ बस स्थानकाला ५४ वर्ष झाली असून तेव्हापासून रेल्वे स्थानकाच्या जवळ पूर्व दिशेला बस स्थानकाचे प्रवेशद्वार आहे. रेल्वेने प्रवास करून उतरल्यावर प्रवाशांना दुसऱ्या गावांना जाण्यासाठी एसटी बस स्थानकावर लगेच जाता यावे यासाठी हे प्रवेशद्वार तयार करण्यात आले होते. परंतू रेल्वे प्रशासनाकडून अचानक हे प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत कोणतीही पूर्व सुचना न देता भुसावळ आगार प्रमुखांना बुधवारी पत्र देत प्रवेशद्वार बंद केले आहे. भुसावळ आगार प्रमुखांनी रेल्वे प्रशासनाला प्रवेशद्वार बंद करू नये यासाठी मागणी पत्राद्वारे केली आहे.
खरेदी खतात प्रवेशद्वाराची जागा बसस्थानकात
भुसावळ बसस्थानकाचे पूर्व दिशेने असलेल्या प्रवेशद्वाराची जागा खरेदीखतात राज्य परिवहन मंडळाच्या भुसावळ आगाराकडे असल्याचे माहिती जळगाव एसटी विभागाचे विभाग नियंत्रकांनी दिली. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने कोणतीही पूर्व सुचना न देता रेल्वे प्रशासनाने प्रवेशद्वार बंद केले आहे.
कायदेशीर नोटीस देणाररेल्वेच्या या कारवाईनंतर भुसावळ आगाराचे प्रमुख व काही कर्मचा-यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. परंतू त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत एसटी विभागाकडून कायदेशीर नोटीस पाठवली जाणार असल्याचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी माहिती दिली.
प्रवाशांना सुविधा देणे हाच उद्देशया मार्गातून अनधिकृत विक्रेते रेल्वे स्थानक परिसरामध्ये प्रवेश करतात. तसेच गुटखा, पान मसाला खाऊन रेल्वेचा परिसर अस्वच्छ करतात. रेल्वे हद्दीत अनधिकृत विक्रेते प्रवेश करीत असतील ते सर्व मार्ग बंद करण्यात येतील. प्रवाशांना सुविधा मिळावा हाच आमचा उद्देश आहे.
-ईती पांडे, डीआरएम भुसावळ