जळगाव : जिल्ह्यात अनेक भागांमध्ये शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे कापूस व सोयाबीनला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. देशातून १४ आॅक्टोबर रोजी मान्सून परतल्यानंतर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे अवकाळी पाऊस झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.शुक्रवारी दुपारी दुपारी ३ वाजेनंतर पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर पावसाची रिपरिप सुरुच होती. त्यानंतर ढगाळ वातावरण देखील कायम होते. सध्या शेतशिवारांमध्ये कापूस वेचणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, शुक्रवारी दुपारून सुरु झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह मजूर वर्गाची चांगलीच धावपळ उडाली.शेतात काम करीत असताना पडली वीजचाळीसगाव तालुक्यातील तळेगाव तांडा येथे वीज पडून कौशल्याबाई चव्हाण (५०) ही महिला ठार झाली. तर पाचोरा तालुक्यातील कुºहाड खुर्द येथे भिंत पडून निर्मलाबाई दगडू माळी (वय ४०) ही महिला जखमी झाली.बोदवडसह तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावत संततधार लावली.या अवकाळी पावसाने ज्वारी पीक काळे पडून कापूस, मका, इतर पिकांना ही नुकसान कारक ठरणार आहे, तर गहू हरभरा या पिकाला फायदेशीर ठरणार आहे.जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी, तोंडापूर, पहूर, नेरी येथे पावसाने हजेरी लावली. पहूरला पावसाने कपाशी व मका पिकांचे नुकसान झाले. खेडी, कढोली ता. एरंडोलला रिपरिप पाऊस झाला. आॅक्टोबर हिटपासून थोडासा दिलासा मिळाला.अरबी सुमद्रालगत कमी दाबाचा पट्टा विकसीत झाल्यामुळे सध्या पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातून मान्सून परतला आहे. त्यामुळे सध्या होणारा पाऊस अवकाळीच म्हटला जाईल. पावसाची स्थिती दोन ते तीन दिवस कायम राहण्याची शक्यता असून, त्यानंतर परिस्थिती बदलून वातावरणात गारवा निर्माण होण्याची शक्यता आहे.-शुभांगी भुत्ते, हवामान तज्ज्ञ, कुलाबा वेधशाळा
अवकाळी पावसामुळे कापूस, सोयाबीनला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 1:04 PM