कोरोनाचा विसर
पाचोरा तालुक्याने कोरोनावर विजय मिळवलेला असून, संपूर्ण तालुक्यात केवळ चारच सक्रिय रुग्ण असल्याचे तालुका आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले असून, जवळपास ३७ हजार नागरिकांना लसीकरण करण्यात आले असून, लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे. शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या लसींच्या प्रमाणानुसार योग्य नियोजन केले जात आहे. शासनाकडून वेळोवेळी कोरोना प्रतिबंधक नियमावली जाहीर केली जात असली आणि नगर परिषद तसेच पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जात असली तरीदेखील शहरात आणि तालुक्यात नागरिकांमध्ये प्रचंड बेपर्वाई दिसून येत आहे. कोरोना निघून गेल्याच्या आनंदात नागरिक मास्क वापरणे आणि फिजिकल डिस्टन्सिंग हे पूर्णपणे विसरून गेल्याचे चित्र आहे.
शाळांना प्रतीक्षा विद्यार्थ्यांची १४ जून रोजी शासकीय परिपत्रकाप्रमाणे शाळा सुरू झाल्या असल्या तरी शाळा आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षाच करावी लागत आहे. काही शाळांमध्ये पटसंख्या राखण्यासाठी विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी शिक्षकांना खेडोपाडी पायपीट करावी लागत आहे आहे, तर शहरातील नामवंत शाळांमध्ये ऑनलाइनवर्गदेखील सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याची विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांनादेखील प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
---
पाचोरा तालुका वार्तापत्र