ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.8 : सकाळी रिमझीम तर रात्री मुसळधार पाऊस पडत असताना दुसरीकडे वीज पुरवठय़ात सातत्त्याने व्यत्यय सुरू असल्याने शहराला पाणीपुरवठा करणा:या वाघूर पाणीपुरवठा योजनेच्या परिसरातील वीज पुरवठा सातत्याने बंद होत होता. या ठिकाणी वादळामुळे झाड कोसळून खंडित झालेला वीजपुरवठा बुधवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास सुरू झाला. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून पाणी पुरवठा न झालेल्या काही भागात बुधवारी सायंकाळी पाणी मिळाले. मात्र तब्बल पाच दिवसांपासून नागरिकांचे अतोनात हाल सुरू आहेत.
पहिल्या टप्प्यात सोमवारी अर्धवट राहिलेल्या शिवकॉलनी व पिंप्राळा भागात पाणी पुरवठा झाला. मात्र रात्री 11 वाजेनंतर पुन्हा गिरणा टाकी, वाघुर पपींग केंद्र व उमाळा जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा बंद झाला होता. हा वीज पुरवठा लवकर सुरू न झाल्यास गुरूवारचा पाणी पुरवठादेखील अनिश्चित असल्याचे महापालिकेतील पाणी पुरवठा विभागाच्या सूत्रांनी रात्री 11.30 वाजता सांगितले. पाऊस पडत असताना पेयजलासाठी मात्र नागरिकांची त्रेधा सुरू आहे.
मनपा प्रशासनाने मात्र बघ्याची भूमिका घेतल्याने पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू असल्याचे चित्र शहरात ठिक¨ठकाणी होते. स्वत:चे टँकर असलेल्या नगरसेवकांनी टँकरद्वारे तर काही नगरसेवकांनी भाडय़ाने टँकर भागवून आपापल्या प्रभागांमध्ये पाणीपुरवठा करण्याचा प्रय} केला. मात्र हे प्रमाण अल्प असल्याने नागरिकांची पाणी मिळविण्यासाठी खूपच दमछाक झाली. तर वीज वितरण कंपनीच्या ढीसाळ कारभारामुळे अनेक भागांमध्ये वीजपुरवठा बुधवारीदेखील खंडितच होता. त्यामुळेही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
16 तास उशिराने पाणीपुरवठा
बुधवारी सायंकाळी 6 वाजता सोमवारी अपूर्ण पाणीपुरवठा झालेल्या पिंप्राळा, खोटेनगर परिसरात पाणीपुरवठा झाला. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाने मंगळवारीच जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार रात्री 8 वाजेपासून नटराज टाकी ते चौघुले मळा, बळीरामपेठ यासह विविध भागात टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठय़ास प्रारंभ झाला. गुरुवारचा पाणीपुरवठा पहाटे 4 वाजेपासून न होता दुपारी उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे. तीन दिवस पाणीपुरवठा 10 ते 12 तास उशिराने होईल. आरएमएस कॉलनीत सोमवारी रात्री 11 ते मंगळवारी सायंकाळी 6 वाजेर्पयत वीजपुरवठा खंडित होता.