जळगाव : तांबापुरातील बिसमिल्ला चौकात राहणाऱ्या जमीलाबी शेख इस्माईल (५४) यांच्या बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी २५ हजार ४०० रुपये रोख व दागिने असा एकूण ४० हजार ४०० रुपयांचा ऐवज लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मंगळवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जमीलाबी या तांबापुरात एकट्याच वास्तव्याला असतात. मोठा मुलगा फारुख शेख हा शिवाजी नगरात तर लहान मुलगा शेख शेरु शिर्डी येथे वास्तव्याला आहे. जमीलाबी यांना मुळव्याधचा आजार असल्याने उपचारासाठी १० नोव्हेंबर रोजीच शिर्डी येथे गेल्या होत्या.त्यामुळे घराला कुलुप होते.२४ रोजी दुपारी ४ वाजता घराचे कुलुप तुटलेले व दरवाजा उघडा दिसल्याने शेजारी राहणाºया हिराबाई यांनी ही माहिती जमीलाबी यांना कळविली. शिवाजी नगरात राहणाºया मुलाने घरी येऊन पाहणी केली असता घरातील कपाट उघडे होते व त्यातील २५ हजार ४०० रुपये रोख, २ सोन्याच्या अंगठ्या, ९ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत व पितळी भांडे असा ४० हजार ४०० रुपये किमतीचा ऐवज लांबविल्याचे निष्पन्न झाले. शामीनाबी यांनी मंगळवारी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.
तांबापुरात बंद घरातून ४० हजाराचा ऐवज लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 10:06 PM