जळगाव- आॅल इंडिया ॉनेजमेंट असोसिएशन व चाणक्य आयोजित २३ व्या स्टुडंट मॅनेजमेट गेमच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाच्यासंघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरत पुन्हा एकदा रायसोनी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या बोद्धिक विकासाला चालना देण्यासाठी मागील २२ वर्षांपासून आयमा व चाणक्य यांच्या सयुंक्त विद्यमाने नवी दिल्ली, चेन्नई, कोईम्बतूर, बँगलोर, पुणे, नवसारी या शहरामध्ये स्टुडंट मॅनेजमेट गेमच्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले जात असते़दरम्यान, राष्ट्रीय स्पर्धेत खान्देशातील स्थानिक विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी मिळावी म्हणून जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाने या स्पर्धेच्या विभागीय फेरीच्या आयोजनाची जबाबदारी स्विकारली होती़ यावेळी झालेल्या विभागीय फेरीत खान्देशातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.दिग्गज महाविद्यालयांच्या संघांना टाकले मागेस्पर्धेत रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयाच्या संघाने अंतिम फेरी गाठत ३० नोव्हेंबर रोजी कोइम्बुतूर येथे झालेल्या महाअंतिम फेरीत सहभाग नोंदविला. यावेळी, सिम्बायोसिस विद्यापीठ, पॅसिफिक विद्यापी उदयपुर, सिंहगड इस्टीट्यूट पुणे, आय. एम. एस.गाजियाबाद, के. आर. मंगलम इस्टीट्यूट गुडगाव या सारख्या १५० विविध मॅनेजमेट संस्थेतील विद्यार्थ्यांनीही सहभाग होता. दरम्यान, या महाविद्यालयांच्या संघांना मागे टाकत अंतिम फेरीमध्ये रायसोनी महाविद्यालयाच्या यश चोरडिया, प्रिन्स महाजन, प्राची जगवाणी, लविना चौधरी यश संपादन केले़विद्यार्थ्यांचा झाला सत्कारचाणक्य स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी माजी मारल्यानिमित्त रायसोनी महाविद्यालयाचे संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्याहस्ते सोमवारी सत्कार करण्यात आला़ याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा. मकरंद वाठ, प्रा. कौस्तुभ सावंत, प्रा. प्रशांत देशमुख, प्रा. मोनाली नेवे, प्रा. राहुल त्रिवेदी, प्रा. राज कांकरिया, व प्रा. तन्मय भाले आदींची उपस्थिती होती़