जळगाव : लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसह इतर मतदारांना देण्यात येणाऱ्या सुविधांच्या आढावा घेण्यासाठी मतदान केंद्र निरीक्षक म्हणून नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राजाराम माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी मतदान केंद्र निश्चित झाल्यानंतर मानेंकडून सर्व मतदान केंद्राची पाहणी करण्यात येणार आहे.दरम्यान, मतदान केंद्र निरीक्षकांसह निवडणूक खर्च निरीक्षकांच्याही नियुक्त्या निवडणूक आयोगाकडून करण्यात आल्या आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी खर्च निरीक्षक म्हणून आंध्रप्रदेश आयआरएस दर्ज्याचे अधिकारी वेणूधर गोडेशी यांची तर रावेर लोकसभा मतदार संघासाठी तामीळनाडूचे के.शंकर गणेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर दोन्ही खर्च निरीक्षक आपला कार्यभार स्विकारणार आहेत.ग्रा.पं.निवडणुकीवेळी उजव्या हाताच्या बोटाला लावणार शाई२४ मार्च रोजी जिल्ह्यात दोन ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाची निवडणूक होणार आहेत तसेच १२ ग्राम पंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे.सरपंचपदासाठी थेट जनतेतून मतदान घेऊन निवड होणार आहे. यानंतर पुढील महिन्यात लोकसभा निवडणूक असल्यामुळे या ग्राम पंचायत निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदाराच्या उजव्या हाताच्या तर्जनीस शाई लावली जावी अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. लोकसभा निवडणूक काळात मतदारांना मतदानाचा हक्क बजावताना अडचण येऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.दरवेळी कोणत्याही निवडणुकीसाठी मतदान झाल्यावर मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीस शाई लावली जाते मात्र लगेच पुढील महिन्यात लोकसभेची निवडणूक असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे.प्रचारात सैनिकांचा फोटो वापर नकोलोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उमेवारांनी किंवा राजकीय पक्षांनी आपल्या जाहिरातीमध्ये सुरक्षा दलातील सैैनिकांचा वापर करण्यास निवडणूक आयोगाकडून निर्बंध घालण्यात आली आहे. याबाबत बुधवारी जिल्हा प्रशासनाला याबाबतचे आदेश प्राप्त झाले आहेत. पुलवामा हल्ल्यातील शहिदांचा छायात्राचित्रांचा वापर किंवा सैनिकांकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत देखील आता कोणत्याही राजकीय पक्षाला करता येणार नाही. जर सैनिकांचा छायाचित्रांचा वापर कोणत्या उमेदवाराने किंवा राजकीय पक्षाने केला. तर त्यांच्यावर आचारसंहिता भंगाची कारवाई केली जाणार आहे.
मतदान केंद्र निरीक्षक म्हणून राजाराम माने नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 2:24 PM
प्रशासकीय तयारीला वेग
ठळक मुद्दे सर्व केंद्रांची पाहणी विशेष पथकासह केली जाणार