नूतन मराठा विद्यालयात राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक ए.पी. सोनवणे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. पी.एम. खैरनार यांनीदेखील प्रतिमेचे पूजन केले. विद्यालयाच्या शिक्षिका एस.एस. संदाशिव यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन एम.पी. भदाणे यांनी केले आणि आभार प्रदर्शन डी.एस. सोनवणे सर यांनी केले.
०००००००००००००००००००००
बहिणाबाई माध्यमिक विद्यालय
बहिणाबाई माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक टी़ एस़ चौधरी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले़ त्यानंतर इयत्ता नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना युवा दिनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. ज्येष्ठ शिक्षिका प्रतिभा खडके यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्याची माहिती उदाहरणासह दिली. यावेळी कार्यक्रमात डॉ. प्रतिभा राणे, स्वाती कोल्हे, सीमा चौधरी, डॉ. विलास नारखेडे, राजेश वाणी, संतोष पाटील, दिनेश चौधरी, विशाल पाटील, चंद्रकांत पाटील, पद्माकर चौधरी, संतोष सोनार, गोविंदा भोळे, जगदीश नेहते, नामदेव निकम आदी उपस्थित होते.
०००००००००००००००००००००
संस्कृती माध्यमिक विद्यालय
संस्कृती माध्यमिक विद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित अभिवादनाचा कार्यक्रम झाला. मुख्याध्यापिका डी.सी. येवले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. त्यानंतर जयेश जाधव, ऋषिकेश बेलदार, अंजली हरळ या विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. सूत्रसंचालन अश्विनी फालक यांनी केले तर आभार ज्योती सोनवणे यांनी मानले़ यशस्वीतेसाठी सुहास कोल्हे, विवेकानंद तायडे, ईश्वर पाटील, कविता पाटील, वसंत महाजन आदींनी परिश्रम घेतले.
००००००००००००००००
ग्रामविकास विद्यालय, पिंप्राळा
पिंप्राळ्यातील ग्रामविकास विद्यालयात मुख्याध्यापक वाय.व्ही. सय्यद यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास एस.आर. पाटील, एस.टी. जाधव, पी.पी. जोगी, स्वप्निल पाटील, एस.बी. निकम, के. व्ही. बारी, बी. एस. कस्तुरे, एस. एन. बारी आदींची उपस्थिती होती.
०००००००००००००००००००००
सीताबाई गणपत भंगाळे विद्यालय
सीताबाई गणपत भंगाळे विद्यालय येथे मुख्याध्यापक नरेंद्र बोरसे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर इयत्ता नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना युवा दिनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. सूत्रसंचालन अनुपमा कोल्हे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय चौधरी, सचिन महाजन, दीपनंदा पाटील, स्वाती पगारे, विजयकुमार नारखेडे आदींनी परिश्रम घेतले.
०००००००००००००००००००
राज प्राथमिक व माध्यमिक विद्यालय
मेहरूण परिसरातील राज प्राथमिक व माध्यमिक तसेच डॉ़ सुनील महाजन महाविद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जितेंद्र ढाके, मोहन कुळकर्णी, सी.डी. पाटील, चंद्रकांत पाटील, महेंद्र पाटील आदींची उपस्थिती होती. प्रतीक्षा पाटील, उज्ज्वला तांदळे, स्वप्निल पाटील या विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. सूत्रसंचालन प्रफुल्ल नेहते यांनी केले. आभार विकास नेहते यांनी मानले.
००००००००००००००००००
विद्या इंग्लिश मीडियम स्कूल (फोटो)
मेहरूण परिसरातील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मुख्याध्यापक हॅरी जॉन यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. शाळा प्रशासिका कामिनी भट यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. यावेळी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
००००००००००००००००००
प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल
स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका श्रद्धा दुनाखे, विजया चवरे, सुषमा थोरात यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला इयत्ता नववीची विद्यार्थिनी श्रध्दा दांडगे तसेच इयत्ता दहावीचा कुणाल बऱ्हाटे व वैष्णवी पाटील यांनी युवा दिनावर माहिती दिली. सूत्रसंचालन व आभार स्वाती पाटील यांनी केले.
०००००००००००००००००००
नूतन मराठा कनिष्ठ महाविद्यालय
नूतन मराठा कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली़ यावेळी उपप्राचार्य प्रा. ए.बी. वाघ यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी संजय पाटील, इ.आर. सावकार, सोनाली कचरे, पी.पी. पाटील, महेश सोनवणे, एल.टी. पवार आदींची उपस्थिती होती.
०००००००००००००००००००००
एसएनडीटी महिला महाविद्यालय
एसएनडीटी महिला महाविद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला़ यावेळी प्राचार्या डॉ़ जयश्री नेमाडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास डॉ. सतीष जाधव होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रकाश कांबळे यांनी केले तर आभार सोमनाथ लोकरे यांनी मानले.
००००००००००००००००००००००००
अभिनव माध्यमिक विद्यालय (फोटो)
माहेश्वर विद्याप्रसारक संचलित अभिनव माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापिका सरोज तिवारी यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीने वेशभूषा साकारत भाषणे दिली. कार्यक्रमाला ज्योती पाटील, नीता पाटील, संतोष सपकाळे, गुरू बारेला, कुणाल बडगुजर, भूषण पाठक आदींची उपस्थिती होती.
००००००००००००००००००
भाऊसाहेब राऊत विद्यालय
स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती भाऊसाहेब राऊत विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक एल.एस. तायडे व पर्यवेक्षक एस.एम. रायसिंग यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमात तुषा भोई यांनी युवा दिनाची माहिती दिली़ एल.एस. तायडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला ए.एस. बाविस्कर, व्ही.जे़. कोळी, पी.बी. मेंढे, एस.डी. राजपूत, आर.ए. क़ोळी, ए.डी. पगारे, वाय़.पी. सोनवणे, डी.बी. सोनवणे, आर.टी. पाटील, आर.एस़. ठाकरे आदींची उपस्थिती होती.
००००००००००००००००
मातोश्री माध्यमिक विद्यालय
मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्याची माहिती देण्यात आली. रितेश शिरसाठ, सौरभ पाटील, प्रणाली गायकवाड, दीपा गुप्ता, वैष्णवी निकुंभ आदींनी भाषणे दिली. यशस्वीतेसाठी मोहिनी चौधरी, रूपाली वानखेडे, अर्चना धांडे, धनश्री फिरके, लीना नारखेडे, नरेश कोळी, दीपक भोळे आदींनी परिश्रम घेतले.
०००००००००००००००००
प्रगती माध्यमिक विद्यालय
प्रगती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापिका शोभा फेगडे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनीषा पाटील होत्या. कार्यक्रमात इयत्ता नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी वेशभूषा साकारली होती. नाट्यछटातून सामाजिक संदेश देण्यात आला. सूत्रसंचालन वैष्णव पाटील हिने केले.
००००००००००००००००००
संजय महाजन विद्यालय
संजय महाजन विद्यालयात मुख्याध्यापिका अर्चना सूर्यवंशी यांच्या उपस्थिती कार्यक्रम पार पडला. यावेळी देविदास बंजारा, गौरव शिरसाठ, बजरंग तिवारी, प्रतीक्षा भोलाणकर, सिब्बू जाधव आदी विद्यार्थ्यांनी भाषणे केली. हितेश पाटील, मुक्ता देशमुख, पूजा तवटे यांनी परिश्रम घेतले.
०००००००००००००००००००
महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालय
महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात डी.एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमात निकिता भालेराव हिने माता जिजाऊ यांची भूमिका साकारली होती. कार्यक्रमाप्रसंगी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. सूत्रसंचालन नीलेश पाटील यांनी केले तर आभार किरणकुमार पाटील यांनी मानले.