जळगाव/नशिराबाद, दि. 7 - शहरातील काम आटोपून नशिराबाद येथे घराकडे जात असताना भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार नितीन एकनाथ आमोदकर (32 रा़ नशिराबाद) याचा जागीच मृत्यू झाला़ तर दुचाकीवर मागे बसलेले प्रमोद प्रल्हाद माळी (वय 30, रा. नशिराबाद) हे गंभीर जखमी झाले. मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर तरसोद फाटय़ाजवळ रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा अपघात झाला़ तीन ते चार दिवसांपासून रक्षाबंधनासाठी मुंबईहून आलेल्या बहिणीकडून ओवाळणीपूर्वीच भाऊ नितीन हा क्रूर काळाने हिरावून घेतल्याने नशिराबादमध्ये शोककळा पसरली. दरम्यान, सलग दुस:या दिवशी महामार्गावर हा अपघात झाला.
नशिराबाद येथील रहिवासी नितीनचा आई, वडील, लहान भाऊ व बहिणी असा परिवार आह़े. वडील शेती करतात़. नितीन एमआयडीसीतील एका कंपनीत वर्षभरापासून नोकरीला होता़. तर लहान भाऊ विनोदही रोजंदारीवर काम करुन भाऊ व वडीलांना उदरनिर्वाहात हातभार लावतो़. रविवारी सुटी असल्याने नितीन घरगुती कामासाठी दुचाकी (क्र. एम.एच. 19 -2939)ने जळगावात आला होता़. सांयकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार पोलिसांनी अपघातग्रस्त दुचाकी ताब्यात घेतली असून ट्रॅक्टरसह चालकाचा पोलीस शोध घेत आह़े. गावातील त्याच्या मित्रांसह नागरिकांनीही जिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली होती़. सायंकाळी नितीनवर नशिराबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आल़े. लग्नासाठी मुलीचाही शोध सुरु असल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली़. घरातील कर्ता पुरुष गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आह़े .
शनिवारी दुपारी याच राष्ट्रीय महामार्गावर बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत कास्ट्राईब संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष भाऊराव अभिमन्यू सपकाळे (वय 60 रा़ भुसावळ) यांचा मृत्यू झाला होता़ तर त्याच्यासोबतचे सेवानिवृत्त शिक्षक रमजान रसुल तडवी रा़रावेर हे गंभीर जखमी झाले होत़े सलग दुस:या दिवशी या महामार्गावर ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या धडकेत नितीनचा जागीच मृत्यू झाला़. नितीनची मोठी बहिण कविता बोरनारे या मुंबईला असतात. सोमवारी रक्षाबंधनसाठी त्या तिघा मुलांसोबत नशिराबादला माहेरी आल्या आहेत़ मात्र रक्षाबंधनाच्या ओवळणीपूर्वीच क्रूर काळाने नितीनवर झडप घातल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. आई, वडील, बहिण व लहान भाऊ विनोद यांना माहिती कळताच जिल्हा रुग्णालय गाठल़े यावेळी कुटुबियांचा आक्रोश मन हेलावणारा होता़ .
राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद फाटय़ाजवळ नशिराबादकडून जळगावकडे भरधाव वेगाने येणा:या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली़ यात चाकाखाली आल्याने नितीनच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्याचा जागीच मृत्यू झाला़. तर प्रमोद हे गाडीवरुन फेकल्या गेल्याने जखमी झाले असून त्याच्या तोंडाला मार लागला आह़े घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक अशोक खरात, वासुदेव मराठे, गोकूळ तायडे यांनी घटनास्थळी धाव घेत 108 रुग्णवाहिकेतून दोघांना जिल्हा रुग्णालयात हलविल़े