जळगाव : शासनाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असा नामविस्तार केल्यानिमित्त कवयित्री बहिणाबाई आनंदोत्सव समितीतर्फे शनिवारी, ६ रोजी ‘माहेर ते सासर रॅली’ मोठ्या उत्साहात काढण्यात आली.बहिणाबार्इंचे माहेर असलेल्या आसोदा येथून सकाळी ९ वाजता मोटरसायकल रॅली निघाली. ही रॅली बहिणाबार्इंचे सासर असलेल्या जुने जळगावातील चौधरी वाड्यात पोहचल्यावर येथून दुसऱ्या रॅलीस सुरुवात झाली.रॅलीत कुलगुरू पी़पी़पाटील, आमदार स्मिता वाघ, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी नगराध्यक्ष बंडू काळे, नगरसेवक विष्णू भंगाळे, उज्ज्वला बेंडाळे यांची मुख्य उपस्थिती होती.रॅलीत जात्यावर दळण करणाºया महिला, बैलगाडीत बसलेले शेतकरी व महिला असे देखावे करण्यात आले होते. याच बरोबर बहिणाबाई यांच्या कवितेच्या ओळीहीचे फलकही ट्रॅक्टर व बैलगाडीवर लावण्यात आले होते. सुरुवातीला उघड्या जीपवर बहिणाबाई यांची भव्य प्रतिमा ठेवण्यात आली होती. रॅलीत विविध शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.जुन्या गावातून निघालेल्या या रॅलीचा समारोप शिवतीर्थ मैदानावर करण्यात आला.
विद्यापीठ नामविस्तारनिमित्त कवयित्री बहिणाबार्इंच्या माहेर ते सासर दरम्यान रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 12:58 PM