आॅनलाईन लोकमतचोपडा, जि. जळगाव, दि. १४ - चोपडा शहरात पंधरा दिवसांनंतर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. त्या विरोधात शिवसेनेतर्फे चोपडा नगरपालिकेवर १४ रोजी सकाळी ११ वाजता मोर्चा हंडा मोर्चा नेण्यात आला. गांधी चौकापासून मोर्चास सुरुवात होऊन चावडी मार्गे, मेनरोड वरून शनिमंदिर, आंबेडकर पुतळा, शिवाजी चौकातून नगरपालिकेवर नगरपालिकेवर धडकला. मोर्चात महिलांचा मोठा समावेश होता. तर विरोधात असलेले आठही नगरसेवक मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा येत असतांना ‘चोपडा नगरपालिका हाय हाय’, ‘चोपडा शहर विकास मंच हाय हाय’ 'नगराध्यक्षांचा अधिकार असो', मुख्याधिकार्यांचा धिक्कार असो यासह घोषणा देत मोर्चा नगरपालिकेत धडकला. मोर्चा नगरपालिका आवारात आल्यानंतर काही शिवसेनेच्या पदाधिका-यांनी भाषणही केले. त्यानंतर निवेदन स्वीकारण्यासाठी आलेल्या नगराध्यक्षा मनीषा चव्हाण, उपनगराध्यक्षा सीमा जैन, मुख्याधिकारी बबन तडवी आणि नगरपालिकेतील अधीक्षक राजू बाविस्कर, शिवनंदन राजपूत हे आले असता त्यांच्या समोर शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते यांनी नगरपालिकेचा अधिकार असो अशा घोषणा देत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याकडे पालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे लक्षात आणून दिले. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी मुख्याधिका-यांवर प्रश्नांची सरबत्ती करत कैचीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नगराध्यक्षांसह मुख्याधिकारी यांनी शिवसेनेचे निवेदन न स्वीकारता कार्यालयात गेले. त्यामुळे काही शिवसैनिक संतप्त झाले होते तर काही शिवसैनिकांनी तापी नदीच्या डोहात पाण्याची पातळी खोल गेल्याने आपणास पाणीपुरवठा अपूर्ण होईल असे लक्षात घेऊन पाण्यासाठी तरतूद का केली नाही असाही प्रश्न उपस्थित केला. या वेळी पोलीस बंदोबस्त होता.मोर्चामध्ये अमृतराज सचदेव, तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील, शहर प्रमुख महेंद्र धनगर, गटनेते महेश पवार, शरद पाटील, दीपक जोहरी, नगरसेवक किशोर चौधरी, विक्की शिरसाठ, संध्या महाजन, मनीषा जैस्वाल, मीना शिरसाठ, लताबाई पाटील, राजाराम पाटील, आबा देशमुख, प्रवीण जैन, जगदीश मराठे, प्रकाश राजपूत, राजेंद्र जैस्वाल, जगदीश मराठे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि महिलांचा समावेश होता.
चोपडा नगरपालिकेवर शिवसेनेतर्फे पिण्याच्या पाण्यासाठी हंडा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 1:30 PM
घोषणांनी दणाणला परिसर
ठळक मुद्देनिवेदन न स्वीकारता परतले पदाधिकारी, अधिकारीशिवसैनिकांचा संताप