ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 10- पद्मावती चित्रपटात इतिहासाची छेडछाड करुन राजपूत व हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याने या चित्रपटाविरुद्ध 19 जानेवारीस भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय राजपूत समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. हा मोर्चा दुपारी 1 वाजता शिवतीर्थ मैदाना पासून निघेल. महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार आहे.मान्यवरांची उपस्थितीनियोजनासाठीची ही बैठक 9 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता विसनजी नगरातील राजपूत समाज उन्नती मडळ हॉल येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार किशोर पाटील, अतुलसिंह हाडा, उदय पाटील, पप्पू राजपूत (पाचोरा), समाधान महाजन (पाचोरा), अॅड. आर. बी. पवार, निकीत पाटील, प्रा.अस्मिता पाटील, विनोद शिंदे, चंद्रशेखर राजपूत, कल्पिता पाटील, प्रमोद राजपूत, बापुराव साळुंखे,सुनील राजपूत, सुरेश राजपूत, राजू राजपूत आदींची जिल्हाभरातून उपस्थिती होती. सूत्रसंचालन रामचंद्र पाटील यांनी केले.