जामनेर, जि.जळगाव : जामनेर येथे प्लॅस्टिक बंदीवर जनजागृती करण्यासाठी शहरातील दिशा फाऊंडेशनतर्फे रॅली काढण्यात आली.पर्यावरण संवर्धन व पर्यावरण जागर या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.जामनेर शहरातील मेडिकल, पंचायत समिती, तहसील कार्यालय पोलीस ठाणे या ठिकाणी रॅलीव्दारे भेटी देऊन पर्यावरण संवर्धन व जागर रॅलीचे महत्व सांगितले.दिशा फाउंडेशन अंतर्गत नर्सिंग क्लासमधील मुला व मुलींनी टाकाऊ कागदापासून पाकिटे बनवली व शिवण कामातून शिल्लक असलेल्या कापडाच्या बॅग बनविल्या व त्या संपूर्ण बाजारात मोफत वाटप केल्या. व्यावसायिकांना त्यांना प्लॅस्टिक बंदीवर माहिती दिली. यासाठी दिशा फाऊंडेशनच्या संचालक भारती पाटील व शिवण क्लासच्या शिक्षिका प्रेरणा गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
प्लॅस्टिक बंदीवर जनजागरणासाठी रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 4:57 PM