जळगाव : श्रीराम जन्मोत्सवानिमित्त शहरातील श्रीराम मंदिरे सकाळपासूनप्रभू श्रीरामचंद्राच्या नामाने दुमदुमली गेली. मंदिरामध्ये दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दर्शंन घेण्यासाठी रथ चौकातील जळगावचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर व नव्या बस स्थानकासमोरील चिमुकले राम मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली होती.ग्रामदैवत श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम नवमी निमित्त श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती मंगेश महाराज यांचे चिरंजीव श्रीराम महाराज जोशी यांचे कीर्तन झाले. विशेष म्हणजे श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर श्रीराम महाराजांनी आजपासून खऱ्या अर्थाने पहिले कीर्तन करुन, प्रभू श्रीरामांच्या सेवेला सुरुवात केलीचिमुकले राम मंदिरात श्रीरामांचा जन्मसोहळा साजरा झाला. यावेळी सुदाम महाराज, विखरणकर महाराज, प्रा.देवनारायण झा. वसंत जोशी, दादा नेवे,आशा फाऊंडेशनचे गिरीश कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुलाल पटेल यांच्याहस्ते प्रभू श्रीरामाची आरती करण्यात आली.
राम सहज आनंद निधानू : जळगावात श्रीराम नवमी उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 1:15 PM